शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राधानगरी धरणात ५९.५६ दलघमी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:21 PM

Rian Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस राहिला; तर उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.  आज, रविवारी  उन्हाचा तडाखाही असला तरी सायंकाळी जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५९.५६ दलघमी पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देराधानगरी धरणात ५९.५६ दलघमी पाणीसाठाशनिवारी गगनबावडा, शाहूवाडीत जोरदार पाऊस

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस राहिला; तर उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.  आज, रविवारी  उन्हाचा तडाखाही असला तरी सायंकाळी जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५९.५६ दलघमी पाणीसाठा आहे.आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४९.४१ दलघमी, वारणा ३८२.४६ दलघमी, दूधगंगा २१५.९१ दलघमी, कासारी २१.५७ दलघमी, कडवी २६.२४ दलघमी, कुंभी २९.४८ दलघमी, पाटगाव ३९.०३ दलघमी, चिकोत्रा १८.३८ दलघमी, चित्री २०.३८ दलघमी, जंगमहट्टी ९.१२ दलघमी, घटप्रभा ३२.१८ दलघमी, जांबरे ११.१८ दलघमी, आंबेआहोळ १.२१, कोदे (ल.पा) १.८९ दलघमी असा आहे.

सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -

गगनबावडा (३८.८), हातकणंगले (१.३), शिरोळ (०.४), पन्हाळा (९.४), शाहूवाडी (२४.७), राधानगरी (२.८), करवीर (३.६), कागल (२), गडहिंग्लज (२), भुदरगड (३), आजरा (३.४), चंदगड (२.९).

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ११.७ फूट, सुर्वे १३.२ फूट, रुई ३९ फूट, तेरवाड ३४.३ फूट, शिरोळ २३.० फूट, नृसिंहवाडी १९.३ फूट, राजापूर ११.३ फूट तर नजीकच्या सांगली ८.९ फूट व अंकली ४.७ फूट अशी आहे.

शनिवारी गगनबावडा, शाहूवाडीत जोरदार पाऊस

कोल्हापुरात मान्सून सक्रिय झाला असला तरी त्याला जोर लागेना. शुुक्रवारी (दि. ११) सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला; मात्र शनिवारी सकाळपासून त्याने पु्न्हा उघडीप दिली. सकाळच्या टप्प्यात कडकडीत ऊन पडले. दुपारी अधूनमधून ढगाळ वातावरणासह काेल्हापूर शहरात पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, पन्हाळा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. करवीर, हातकणंगले, कागल, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यांत अधूनमधून नुसती भुरभुर राहिली.

 

 

 

टॅग्स :Rainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणkolhapurकोल्हापूर