शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर जि.प'च्या ५७ कोटींच्या कटात वित्त मधील खबऱ्या; पोलिसांकडून संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:18 IST

मोठ्या रकमेचे खाते नंबर, धनादेशाचा नंबर बाहेर

कोल्हापूर : कोट्यवधी रूपयांची खाती आणि मूळ धनादेशावरील क्रमांक बनावटगिरीसाठी वापरल्यामुळे ५७ कोटी ४ लाख रूपये हडप करण्याच्या डावात जिल्हा परिषद वित्त विभागातील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील खबऱ्या कर्मचारी असल्याचा संशय पोलिसांना प्रथमदर्शनी आला आहे.कोणत्याही बँकेत त्रयस्थाला कोणत्या खात्यात किती रक्कम आहे, धनादेशाचा क्रमांक किती आहे, हे सांगितले जात नाही; पण या प्रकरणात जिल्हा परिषदेकडील कोट्यवधी रुपयांचे खाते नंबर आणि धनादेशाचे क्रमांक फसवणूक करणाऱ्याकडे गेले आहेत. म्हणून पोलिसांना हा संशय आला आहे.जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहारातील घोटाळ्यानंतर आता वित्त विभागाच्या बनावट सहीने बनावट धनादेश तयार करून परस्पर रक्कम वर्ग करण्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतून जिल्हा परिषदेचा निधी परस्पर लाटण्याचा नियोजनबध्द कट रचला होता.मंगळवारी पहिल्या टप्प्यात १८ कोटी ४ लाख ३० हजारांची रक्कम वर्ग केल्यानंतर बुधवारी शासकीय सुट्टी होती. त्यामुळे हे पैसे खपवण्यात यश येईल, असे अज्ञातांना वाटले होते; पण जिल्हा परिषदेच्या ज्या खात्यावरील धनादेश कोणत्याही कारणासाठी दिला जात नाही, त्याच खात्यावरून पैसे वजा झाल्याने वरिष्ठांनी तातडीने सूत्र हलवली. हा सर्व प्रकार उघड होऊन तब्बल ५७ कोटींवरील रकमेवरील डल्ला मारण्याचा कट उधळला आहे.

बनावट धनादेशजिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा बँकेच्या शाखेत जावून आपल्या खात्यावरील व्यवहाराची माहिती घेतली. त्यावेळी त्यात वटवलेले तिन्ही धनादेश आणि जिल्हा परिषदेकडील धनादेश यामध्ये तफावत दिसून आली. यावरून जिल्हा परिषदेची रक्कम परस्पर हडप करण्यासाठी बनावट धनादेश तयार केल्याचे उघड झाले.

बनावटगिरीसाठी काय केले ?

  • जिल्हा बॅंकेचे धनादेशावरील खातेनंबरचे शेवटचे सात अंकी हे स्टॅपिंग असतात. बनावट वटलेल्या तिन्ही धनादेशावरील खातेनंबर छापील आहेत.
  • बँकेच्या धनादेशात दिनांकच्या खाली ‘या धारक को ऑर बेरर किंवा ऑर ऑर्डर असे असते. मात्र बनावट धनादेशात असे नाही.
  • वित्त विभागाकडील दिलेल्या प्रत्येक धनादेशावर शिक्का मारला जातो. बनावट धनादेशावर इंग्रजी अक्षर रचना चुकीची दिसून येते.
  • जिल्हा परिषदेचा पत्ता आणि बनावट धनादेशातील पत्त्यात फरक आहे.
  • बनावट धनादेशावरील रकमेचा व शिक्क्यातील स्पेलिंग चुकीचे आहे.
  • धनादेशावरील अधिकाऱ्याच्या नावात तफावत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस