शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'गोकुळ'मध्ये कराराचा भंग करून ५१ जणांना केले सुपरवायझर, कामगार संघटनेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:48 IST

कोणत्याही क्षणी संपाचे हत्यार उपासण्याचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये (गोकूळ) कामगार संघटनेसोबत झालेल्या सामंजस्य कराराचा भंग करून संचालक मंडळाने मर्जीतील ५१ लोकांना पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून पदोन्नती दिल्याने इतर कामगारांमध्ये खदखद व्यक्त होत आहे. संचालक मंडळाने कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत विचार न केल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटनेने दिला आहे. संघटनेच्यावतीने त्याची तयारी म्हणून गोवा, गडहिंग्लज, मुंबई, शिरोळ केंद्रावर बैठका घेऊन जनजागृती सुरू केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!संघामध्ये ज्येष्ठ दिवंगत नेते गोविंद पानसरे यांच्या विचाराने काम करणारी संघटना सक्रिय आहे. या संघटनेसोबत व्यवस्थापनाने करार केला असून त्याची मुदत जून २०२६ ला संपत आहे. त्यामध्ये सेवाज्येष्ठता, पात्रता आणि कामाची गुणवत्ता या आधारे पदोन्नती द्या, असे संघटनेचे म्हणणे होते. संचालक मंडळाने त्यास संमतीही दिली परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांना बाजूला करून मर्जीतील ५१ लोकांना पदोन्नती दिली आहे.संघामध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गृहित धरून त्यानुसार २०१८ मध्ये २०३८ कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित केला आहे. आता १९५० कायम, ४२० रोजंदारीवरील असे २३७० कर्मचारी सेवेत आहेत. निश्चित केलेला पॅटर्न व प्रत्यक्षातील कामगार यांच्यात मोठी तफावत असून ही संघाला मारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शिवाय पदांची मोडतोड केली आहे. गोगवे, तावरेवाडी, शिरोळ चिलिंग सेंटरला कर्मचारी कमी असताना बिद्री, गडहिंग्लजला मात्र जास्त आहेत.

संचालक २५ परंतु कामगार प्रतिनिधी शून्य..?संचालक मंडळाने राजकीय ताकद वापरून संचालक मंडळाची संख्या वाढवून ती २५ केली, परंतु मंडळावर दोन कामगार प्रतिनिधी घ्यावेत. या मागणीला कायदेशीर आधार असूनही ती धुडकावली आहे. सहकार कायदा कलम ७३ अ अन्वये असे प्रतिनिधी नियुक्त करता येतात. विभागीय उपनिबंधकांनी तशी सूचना देऊनही कामगार प्रतिनिधी नेमलेले नसल्याबद्दल नाराजी आहे.

निवृत्त अधिकाऱ्यांना लाभ..संघाने अन्य सहकारी संस्थांतून निवृत्त झालेल्या पाच अधिकाऱ्यांना सेवेत घेऊन त्यांना गलेलठ्ठ पगार दिले आहेत. परिणामी संघात सहायक व्यवस्थापक पदावर अनेक वर्षे काम करत असलेल्या लोकांवर अन्याय झाला आहे. निवृत्त झालेल्या लोकांना अन्य सहकारी संस्थात काही हजारांत पगार असताना संघाने मात्र त्यांना दोन-दोन लाख रुपये पगार का दिला आहे, अशी विचारणाही कामगार संघटनेने केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gokul Faces Labor Unrest Over Supervisor Promotions, Union Alleges Breach.

Web Summary : Kolhapur's Gokul milk union faces worker backlash for allegedly violating agreement by promoting 51 supervisors disregarding seniority. Union threatens renewed protests over unresolved demands and external hires, citing favoritism.