शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या संपामुळे ५० टक्के यंत्रमाग बंद

By admin | Updated: July 31, 2015 22:48 IST

दररोज ६० कोटी रुपयांच्या कापडाचे उत्पादन ठप्प : संपाची कोंडी कशी फुटणार, वस्त्रनगरीला चिंता

राजाराम पाटील- इचलकरंजी -सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या संपामुळे सुताची बिमे मिळत  नसल्याने शहर व परिसरातील ५० टक्के यंत्रमाग कारखाने बंद पडले आहेत. परिणामी दररोज सुमारे ६० कोटी रुपये किमतीच्या कापडाचे उत्पादन ठप्प झाले असून, संपाची कोंडी कशी फुटणार, याचीच चिंता येथील उद्योजक-व्यापाऱ्यांना लागली आहे.शासनाने जाहीर केलेल्या यंत्रमाग कामगार सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मंगळवार (२१ जुलै) पासून सायझिंग-वार्पिंग कामगारांनी बेमुदत संप सुरू केला. सुरुवातीला ७० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले. संपाचे लोण वाढत जाऊन आता ९० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर यांनी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे लालबावटासायझिंग-वार्पिंग कामगार संघटना व सायझिंगधारक कृती समितीची यांची २८ जुलैलाबैठक घेतली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित किमान वेतनाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायप्रविष्ट किमान वेतनासाठी कामगार संघटनेने केलेला संप बेकायदेशीर आहे आणि न्यायप्रविष्ट विषयावर आम्हाला बैठकीत म्हणणे मांडता येणार नाही, अशी भूमिका सायझिंगधारक समितीने मुंबईतील मंत्री मेहता यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत घेतली, तर न्यायालयाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. परिणामी किमान वेतन मागण्याचा हक्क कामगारांचा आहे, असे म्हणणे कामगार संघटनेने मांडले. यावर कामगार मंत्री मेहता यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत संप मागे घ्यावा, असे आवाहन केले; पण कामगारांना विचारून सांगतो, असे म्हणून मुंबईतून परत आलेल्या कामगार संघटनेने संप चालूच राहण्याची घोषणा केली.गेले अकरा दिवस संप चालू असल्याने यंत्रमाग कापड विणण्यासाठी लागणाऱ्या बिमांची निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील सव्वा लाख यंत्रमागासाठी बिमे मिळत नसल्याने कापडाच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे. दररोज ६० कोटी रुपयांच्या कापडाची निर्मिती थांबल्याने वस्त्रनगरीला आता आर्थिक टंचाईने ग्रासले आहे. वस्त्रोद्योगात असलेली मंदी आणि कापड उत्पादनाबरोबर खरेदी-विक्रीची उलाढालही थांबली. अशा दुहेरी कचाट्यात येथील यंत्रमाग उद्योग सापडला आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी आठवडी बाजारानिमित्ताने होणाऱ्या कामगारांच्या पगारावरही झाला आहे.आॅटोलूम उद्योगावरही परिणामसायझिंग कामगारांच्या संपाचा परिणाम आता आॅटोलूम उद्योगामध्येसुद्धा दिसू लागला आहे. सुमारे दहा टक्के आॅटोलूम बंद पडले असून, आणखीन आठवडाभराने ५० टक्के आॅटोलूम बंद पडतील. याचबरोबर आॅटोलूम उद्योगात सध्या मंदी असून, जॉब रेट प्रतिपीक दोन ते तीन पैशांनी कमी झाला आहे, तर काही कारखान्यांमधून २४ तासांऐवजी बारा ते सोळा तास कारखाने सुरू आहेत, अशी माहिती इचलकरंजी शटललेस लूम्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी सांगितली.हेकेखोर कामगार नेत्याला वठणीवर आणण्याची वेळसायझिंग कामगारांच्या संपाबाबत वस्त्रनगरीचे नेते म्हणवून घेणाऱ्या पुढाऱ्यांनी एकजूटपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सायझिंग कामगारांचे नेतृत्व म्हणून नेहमी आडमुठे धोरण घेत शहराला वेठीस धरणाऱ्या तथाकथित कामगार नेत्याला आता वठणीवर आणण्याची वेळ आली आहे. नाही तर इचलकरंजीच्या यंत्रमाग उद्योगाची वाट लागेल, अशी तिखट प्रतिक्रिया शहरातील यंत्रमागधारक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली.