Kolhapur ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:09 IST2026-01-20T12:09:18+5:302026-01-20T12:09:46+5:30

सोमवारी राधानगरीत सर्वाधिक अर्ज

42 nomination papers filed for Kolhapur Zilla Parishad and 43 for Panchayat Samiti | Kolhapur ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचा

Kolhapur ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचा

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजवर जिल्हा परिषदेसाठी ४२ व पंचायत समितीसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी ८१८ उमेदवारांना १ हजार ५७० उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले.

आजअखेर निवडणूक विभागातून ४२ व निर्वाचन गणातून ४३ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आजअखेर १ हजार ९११ उमेदवारांना ३ हजार ८५१ इतके अर्ज वितरित करण्यात आले आहेत.

वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती, आघाडीतही गोंधळ; बहुरंगी लढती होणार 

सोमवारी जिल्हा परिषदेसाठी ४१ उमेदवारांनी ५६ अर्ज तर पंचायत समितीसाठी ४२ उमेदवारांनी ५६ अर्ज दाखल केले. सोमवारी राधानगरी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ७ उमेदवारांनी १५ तर पंचायत समितीसाठी १५ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज भरले.

सोमवारी तालुकानिहाय अर्ज भरलेले उमेदवार (कंसात अर्जांची संख्या)

तालुका : जिल्हा परिषद : पंचायत समिती
शाहुवाडी : ५ (५) : ४ (४)
पन्हाळा : ३ (३) : ०
हातकणंगले : ४ (५) : १ (१)
शिरोळ : १ (१) : ३(३)
करवीर : ५ (८) : १ (१)
गगनबावडा : ० : ०
राधानगरी : ७ (१५) : १५ (२८)
कागल : ४ (५) : ५ (६)
भुदरगड : ५ (६) : ११ (११)
आजरा : १ (२) : ०
गडहिंग्लज : ५ (५) : २ (२)
चंदगड : १ (१) : ०
एकूण : ४१ (५६) : ४२ (५६)

Web Title : कोल्हापुर ZP चुनाव: परिषद और समितियों के लिए 83 नामांकन दाखिल

Web Summary : कोल्हापुर जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में 83 नामांकन दाखिल हुए। अब तक 1,911 उम्मीदवारों को 3,851 आवेदन पत्र वितरित किए गए। राधानगरी नामांकन में सबसे आगे।

Web Title : Kolhapur ZP Election: 83 Nominations Filed for Council and Committees

Web Summary : Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections see 83 nominations filed. 3,851 application forms distributed to 1,911 candidates till date. Radhanagari leads in filings.