ग्रामीण भागात ४०, शहरांत ४९ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:02+5:302021-02-09T04:27:02+5:30

कोल्हापूर : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी झालेल्यांबाबत विभाग प्रमुखांनी आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी ...

40% in rural areas and 49% in urban areas | ग्रामीण भागात ४०, शहरांत ४९ टक्के लसीकरण

ग्रामीण भागात ४०, शहरांत ४९ टक्के लसीकरण

कोल्हापूर : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी झालेल्यांबाबत विभाग प्रमुखांनी आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना लसीकरण मोहीम जिल्हा कृती दल समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत ही सूचना केली.

या बैठकीत जिल्ह्यामध्ये ६९ हजार ८० लसी राज्य शासनाकडून आल्या आहेत. त्यापैकी ३८ हजार ८० लसी विविध आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडे ३१ हजार लसींचा साठा आहे. सोळा जानेवारी ते ६ फेब्रुवारी यादरम्यान ग्रामीण भागात उद्दिष्टाच्या ४० टक्के, तर शहरी भागात ४९ टक्के लसीकरण झाले आहे. कोतोली व हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय, मुरगूड ग्रामीण रुग्णालय अशा चार केंद्रांची नव्याने वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी १७ आणि शहरासाठी ८ अशा एकूण २५ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. फारूख देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी, लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व सर्वसामान्यांची भीती घालवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: 40% in rural areas and 49% in urban areas