शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

आजरा साखर कारखान्यातील बेअरींग चोरी प्रकरणात ७ अधिकाऱ्यांसह ३४ जण दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 19:12 IST

समितीच्या अहवालानंतर कर्मचारी वर्गासह सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली.

सदाशिव मोरेआजरा : आजरा साखर कारखान्यातील सहा बेअरींग चोरी प्रकरणात सात अधिकाऱ्यांसह ३४ जणांना दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने आज, सोमवारी आपला अहवाल संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला. समितीच्या अहवालानंतर कर्मचारी वर्गासह सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली.साखर कारखान्यातून सन २०१८ - २०१९ चा गळीत हंगाम १७  फेब्रुवारी २०१९ रोजी समाप्त झाला. त्यानंतर २६ जुलै २०२१ पर्यंत आजरा कारखान्यातील २७० किलोच्या ४  व ९२  किलो वजनाच्या २ अशा एकूण ६ बेअरींग चोरीला गेल्याची फिर्याद प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी आजरा पोलिसात दिली. त्याअनुषंगाने  साखर कारखान्याने चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने आज संचालक मंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला. यात प्रशासन प्रमुख, आजी-माजी सुरक्षा अधिकारी, जमादार, वॉचमन  व स्टोअरचे ७ अधिकाऱ्यांसह ३४ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे...बेरिंगची नेमकी रक्कम किती?संचालकांच्या बैठकीत ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांनी या एका बेअरींगची किंमत ७  लाख असून एकूण ४२ लाखांच्या बेअरींग चोरीला गेल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष शिंत्रे व केसरकर यांच्यात बेअरींगच्या रक्कमेवरुन जुगलबंदी उडाली. त्यामुळे नेमकी ६ बेअरींगची रक्कम किती? व बेअरींगसोबत आणखीन काय चोरीला गेले याबाबत अद्याप संदिग्धता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCrime Newsगुन्हेगारी