शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वीज बिलाबाबत चार दिवसांत ३१६० तक्रारी, महावितरणकडे लागली रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:35 AM

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवारण झाले असून केवळ १० तक्रारी शिल्लक आहेत. या कक्षाचा लोकांना चांगला उपयोग होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देवीज बिलाबाबत चार दिवसांत ३१६० तक्रारी, महावितरणकडे लागली रांग ३१५० तक्रारींची केली सोडवणूक

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवारण झाले असून केवळ १० तक्रारी शिल्लक आहेत. या कक्षाचा लोकांना चांगला उपयोग होत असल्याचे दिसत आहे.लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग आणि बिलवाटपाची प्रक्रिया पूर्णपणे बंद होती. १ जूनपासून ही सर्व प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. तीन महिन्यांची बिले एकदमच घरी आल्याने आकडा वाढला आहे. लावलेले दर कळत नाहीत, युनिट किती झाले हे समजत नाही, अशी तक्रारी ग्राहकांतून वाढल्या. त्यातूनच जागोजागी आंदोलनेही सुरू झाली होती.

बिलावरून वातावरण तापू लागल्यानंतर महावितरणने जिल्ह्यातील ३७ ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी कक्ष स्थापन केले. येथे महावितरणचे अधिकारी यांना आलेल्या बिलाविषयी ग्राहकाचे समाधान होत नाही तोवर त्यांना विश्लेषण करून देतील, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हे अधिकारीही दिवसभर येथे थांबून येणाऱ्यांचे समाधान करीत आहेत.जिल्ह्यातून ३१६० ग्राहकांनी तक्रारी नोंंदवल्या होत्या. त्यांत १५४९ तक्रारी या शहरी भागातून आलेल्या होत्या. एकूण तक्रारींपैकी घरगुती २६८२ होत्या, त्यातील २६७३ ची सोडवणूक झाली तर नऊ ग्राहकांचे समाधान होऊ शकले नाही.

व्यावसायिकच्या २२७ तक्रारी आल्या, त्या सर्वच्या सर्व सोडवण्यात आल्या. औद्योगिकच्या २२९ तक्रारी होत्या, त्यांतील एक शिल्लक राहिली. बाकी सर्व सुटल्या. इतर तक्रारी २२ आल्या होत्या, त्यांतील २१ सुटल्या, एकच शिल्लक राहिली.उपविभागनिहाय तक्रारी

  • आजरा ३२
  • चंदगड १६
  • गडहिंग्लज ५२
  • नेसरी १६
  • इचलकरंजी (ग्रा.) ३७८
  • इचलकरंजी ३३५
  • इचलकरंजी ९६
  • हातकणंगले १८
  • जयसिंगपूर ४७
  • कुरुंदवाड ५०
  • शिरोळ १८
  • वडगाव ०६
  • गगनबावडा १८
  • कदमवाडी २१
  • कळे ४९
  • कोडोली ३२
  • मलकापूर ३८
  • पन्हाळा २३
  • परिते १६
  • फुलेवाडी ३६
  • गारगोटी ५८
  • हुपरी १३९
  • कागल ५७
  • मुरगूड ० ८
  • राधानगरी ५२
  • कोल्हापूर शहर - १५४९
टॅग्स :mahavitaranमहावितरणCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर