शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कोल्हापुरातील पंचगंगेची प्रदूषणमुक्ती केव्हा..?; ३० एमएलडी सांडपाणी थेट नदीत 

By भारत चव्हाण | Updated: June 18, 2024 17:48 IST

महापालिकेचे प्रयत्न तोकडे: २८० कोटींची कामे लवकरच सुरू होणार

कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचेप्रदूषण रोखण्याच्या आणाभाका प्रशासन गेली अनेक वर्षे घेत आहे. परंतु प्रदूषणापासून मुक्ती देण्यात त्यांना आजही यश आलेले नाही. या प्रश्नांवर दबाव निर्माण करण्यात आपण सारेच कोल्हापूरकर कमी पडत आहोत. वानराच्या घराप्रमाणे प्रश्न तयार झाल्यावरच आपल्याला त्याची जाग येते. या प्रदूषणाची तीव्रता मांडणारी वृत्तमालिका आजपासून..भारत चव्हाणकोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिका प्रशासनाने बऱ्याच उपाययोजना केल्या असल्या तरी त्यास शंभर टक्के यश आलेले नाही. आजही शहरातील ३० एमएलडी सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. शंभर टक्के सांडपाणी रोखणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया करण्यास आणखी किमान दीड वर्ष लागणार आहे. हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याची २८० कोटींची कामे लवकरच सुरू होणार आहेत. नदीच्या प्रदूषणात सर्वांत मोठा वाटा कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचा आहे; परंतु या दोन्ही महापालिकांना या प्रदूषणाबद्दल फारसे देणेघेणे नाही, असाच अनुभव गेल्या दशकातील आहे.दुधाळीतील जादा सांडपाणी प्रक्रिया केंद्रसर्वाधिक सांडपाणी वाहून नेणारा दुधाळी हा दुसऱ्या क्रमांकाचा नाला आहे. या नाल्यावर १७ ‘एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. आता आणखी सहा एमएलडी क्षमतेचे जादा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून, त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.चार खेडेगावांचे सांडपाणी नदीतशहराच्या हद्दवाढीस विरोध करणाऱ्या शहरालागतच्या कळंबा, पाचगाव, आर. के. नगर, मोरेवाडी या गावांतील सुमारे १५ एमएलडी सांडपाणी रोज जयंती व गोमती नाल्यातून येत असून, या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा भार महापालिका यंत्रणेवर पडला आहे.पाच नाल्यांतून सांडपाणी नदीतशहरातील लक्षतीर्थ वसाहत, सीपीआर, राजहंस, लाइन बाजार, बापट कॅम्प येथून येणाऱ्या नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. या नाल्यावर फायटो ट्रीटमेंट, तसेच ब्लिचिंग पावडरचा तात्पुरता डोस दिला जात आहे.

सध्या कार्यरत सांडपाणी प्रक्रिया केंद्र

  • कसबा बावडा - ७६ एमएलडी
  • दुधाळी - १७ एमएलडी
  • कसबा बावडा - ६ एमएलडी

प्रस्तावित कामे अशी -

  • दुधाळी ड्रेनेज लाइन, एसटीपी - ५७ कोटी
  • जयंती नाला उपसा केंद्र व एसटीपी - ५२ कोटी
  • लाइन बाजार ड्रेनेज, उपसा केंद्र - ३२ कोटी
  • बापट कॅम्प झोन ड्रेनेज लाइन, एसटीपी - १३९ कोटी
  • तीन कामांच्या निविदा प्रसिद्ध, एकाची प्रक्रिया सुरू

रोजच्या सांडपाण्याचा हिशोब

  • रोज निर्माण होणारे सांडपाणी - १३५ एमएलडी
  • रोज प्रक्रिया होणारे सांडपाणी - १०५ एमएलडी
  • थेट नदीत मिसळणारे सांडपाणी - ३० एमएलडी

रखडलेले भूसंपादनलाइन बाजार येथे नाला अडविण्याकरिता बंधारा घालावा लागणार आहे. त्या ठिकाणी सहा एमएलडी उपसा केंद्र उभारण्याकरिता लागणारी जागा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनात अडचणी आल्या आहेत. मूळ मालकांनी विरोध केल्याने भूसंपादनाचे काम रखडले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण