शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

कोल्हापूर जिल्ह्यातील २८९ बेवारस वाहनांचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:04 IST

गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २८९ बेवारस वाहनांचा होणार लिलावपोलीस प्रशासनाचा जाहीरनामा : मूळ मालकांना दोन महिन्यांची मुदत

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत ही वाहने मूळ मालकांनी मालकी हक्काचे हितसंबंध, वारसा, तारण, विमा हक्क याबाबतचे मूळ दस्तऐवज दाखवून घेऊन जावी. त्यानंतर या सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोटिसीद्वारे जाहीर केले आहे.चोरी, अपघात किंवा अन्य गुन्ह्यांत हस्तगत केलेल्या दुचाकी संबंधित पोलीस ठाण्याच्या आवारात लावून ठेवली आहेत. न्यायालयीन प्रक्रियेच्या झंझटीमुळे अनेकांनी वाहने सोडवून घेण्याची तसदीच दाखविलेली नाही. अपघातातील वाहने पुन्हा घरी नको, ती पोलीस ठाण्यातच सडून राहू दे, अशा मानसिकतेखाली अनेक अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्याच्या दारात अनेकवर्षे पडून आहेत.

उन्हाळा, पावसाळ्यात ती उघड्यावरच पडल्याने सडून, गंजून गेली आहेत. जिल्ह्यातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर, कागल, मुरगूड, गांधीनगर, शिरोली एम. आय. डी. सी. गोकुळ शिरगाव, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, शिवाजीनगर, गावभाग इचलकरंजी, कुरुंदवाड, हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, वडगाव, भुदरगड, आजरा, नेसरी, गडहिंग्लज, चंदगड, आदी २६ पोलीस ठाण्यांच्या दारात गुन्ह्यांतील वाहनांचा ढिग साचल्याने पोलीस ठाण्यांचा श्वास कोंडत होता.

पावसाचे पाणी या गाड्यांमध्ये साचून राहिल्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजाराचा सामना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. चांगली वाहने अनेकवर्ष पडून राहिल्याने ती सडून, गंजून निकामी झाली आहेत. त्यांना वापरात आणता येणार नाही, अशी बिकट अवस्था बहुतांशी वाहनांची झाली आहे. मालक असूनही अपुऱ्या कागदपत्रामुळे ती घरी घेऊन जाता आलेली नाहीत, तर अनेक वाहनांचे मालकच नाहीत, आदी कारणांमुळे ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात सडत पडली आहेत.

सुमारे २७७ दुचाकी, तीनचाकी ६, चारचाकी ६, अशा सुमारे २८९ वाहनांचा अखेर लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांची मंजुरी घेऊन रविवारी प्रशासनाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत सर्वोतोपरी प्रयत्न करून बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता, संबंधित वाहनांचे मालक मिळून आलेले नाहीत.फक्त सांगाडेचपोलीस ठाण्याच्या आवारात सडत असलेल्या बहुतांशी वाहनांचे सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. चांगले पार्ट चोरीला गेले आहेत. ते कोणी नेले, पोलीस ठाण्याच्या दारातून पार्टची चोरी होते, हा संशयाचाच प्रकार आहे. अगदी दुचाकीच्या बॅटऱ्या, इंजिन, टायर यांचा समावेश आहे.वाहनांच्या मालकी हक्कांबाबत कोणीही पोलीस ठाण्यांशी संपर्क केलेला नाही; त्यामुळे ही वाहने पोलीस ठाण्याच्या दारात अनेक वर्षे बेवारस स्थितीत पडून असल्याने, ती गंजून खराब होत असल्याने त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मला अधिकार असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा १९५१ कलम ८५ प्रमाणे बेवारस वाहनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

 

जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेल्या वाहनांबाबत आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देऊन आपले वाहन घेऊन जावे. ६0 दिवसांनी संबंधित वाहनांवर आपला हक्क सांगता येणार नाही. या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

 

१) जिल्ह्यातील २६ पोलीस ठाण्यांच्या आवारातील वाहनांचा लिलाव२) दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा २८९ वाहनांचा समावेश३) वाहने घेऊन जाण्यासाठी मूळ मालकांना ६0 दिवसांची मुदत४) अनेक वाहनांचे मालकच नाहीत५) पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांच्या कोंडीमुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरbikeबाईक