शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील २,८८२ शाळा उद्या राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:26 IST

२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती लागू नाही

कोल्हापूर : टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघाच्या वतीने उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून मोर्चा काढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ हजार ८८२ शाळांची घंटाच वाजणार नाही.टीईटी संदर्भातील अन्यायकारक निर्णय राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू झाल्यानंतर २३ ऑगस्ट, २०१० रोजी एनसीर्टईने शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली. या नियमानुसार २०१० नंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी डीएड, बीएड प्लस टीईटी अनिवार्य केली आहे. महाराष्ट्र शासनानुसार १३ फेब्रुवारी २०१३ पासून टीईटी लागू केली आहे. याचा अर्थ २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती लागू नाही. परंतु, १ सप्टेंबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाने धक्कादायक आदेश देत सर्व शिक्षकांना सक्ती केली. फक्त सेवानिवृत्तीलाही पाच वर्षे उरलेल्या शिक्षकांना सूट दिली असली तरी प्रमोशनसाठीही टीईटी बंधनकारक आहे. आरटीई कलम २३ मध्ये सुधारणा करून २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना कायमस्वरुपी संरक्षण देण्यात यावे.महाराष्ट्र सरकाने शिक्षकांचा प्रश्न तातडीने हाताळावा आणि केंद्रस्तरीय चर्चेला सुरुवात करावी. १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. यासह अन्य मागण्यांसाठी उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जवळपास १२ ते १५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत.

  • जिल्ह्यातील शाळांची संख्याजिल्हा परिषद प्राथमिक शाळा : १९७०
  • जिल्हा परिषद माध्यमिक : ८५६
  • कोल्हापूर महापालिका : ५६
  • एकूण शाळा : २८८२
English
हिंदी सारांश
Web Title : Teachers Unite Against TET Mandate; Kolhapur Schools to Strike

Web Summary : Kolhapur teachers protest mandatory TET, demanding reconsideration for pre-2013 educators. Around 2,882 schools will be closed as 12-15,000 teachers participate in the march, seeking government intervention and RTE protection.