इचलकरंजी : गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एकाची २५ लाख ४० हजार रुपयांची एका महिलेने फसवणूक केली. याप्रकरणी अश्विनी महेश ओझा (रा. विकली मार्केटसमोर) हिच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत संतोष माणिकचंद मालू (वय ५४, रा. कागवाडे मळा) यांनी तक्रार दिली आहे.अश्विनी हिने सन २०२२ मध्ये संतोष यांना गृहकर्ज मंजूर करून देतो, असे सांगून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेतली. त्यानंतर वेळोवेळी अश्विनी हिला संतोष व प्रतीक मालू यांच्या खात्यावरून कमिशनपोटी आरटीजीएसद्वारे २५ लाख ४० हजार रुपये दिले. परंतु तिने आजअखेर कर्ज मंजूर करून दिले नाही. त्यामुळे मालू यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यामुळे अश्विनी हिने बारा लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेश वटला नाही. याबाबत पुन्हा ओझा यांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत ओझा यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Kolhapur: गृहकर्जाच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक, इचलकरंजीतील महिलेविरुद्ध तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:48 IST