शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी २४१, तर पंचायत समितीसाठी ४५५ उमेदवार रिंगणात; प्रचाराला येणार जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:17 IST

बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती, जिल्हाभर चित्रविचित्र आघाड्या

कोल्हापूर : पावणेनऊ वर्षांनी होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक इच्छूकांनी अगदीच गांभीर्याने घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी २४१, तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४५५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोन्हीसाठी अनुक्रमे ४१८ आणि ७५८ जणांनी माघार घेतल्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. महायुतीमधील तीनही पक्ष राजकीय लढाईत एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकले आहेत. ५ फेब्रुवारीला मतदान होत असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर चढणार आहे.बऱ्याच प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी युवा आणि मध्यमवयीन राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, असे भक्कम दोन राजकीय पर्याय मिळाल्यानेही अनेकांनी या पक्षांची चिन्हे घेऊन रिंगणात उडी घेतली आहे.पंधरा दिवसांपूर्वीची स्थिती पाहता महायुतीमध्ये कमीत कमी वांधे होतील, अशी स्थिती होती; परंतु युती झाल्यानंतर नाराज कार्यकर्ते आपसूक विरोधी पक्षांना मिळू नयेत आणि आपापला विधानसभा मतदारसंघातील गट टिकून राहावा यासाठी बहुतांश पक्षांनी आपापल्या सोयीनुसार आघाडी आणि युती केल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच राजकीय सोय म्हणूनही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असून, मतदानाच्या दिवसापर्यंत पक्षांतर, पाठिंबा, सोडचिठ्ठीचे हे प्रकार सुरू राहण्याची शक्यता आहे.

  • जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची माघार ४१८
  • पंचायत समित्यांसाठी उमेदवारांची माघार ७५८
  • ६८ जागांसाठी रिंगणातील उमेदवार २४१
  • पंचायत समित्यांसाठी रिंगणातील उमेदवार ४५५

तालुका - जिल्हा परिषद उमेदवार - पंचायत समिती उमेदवारशाहूवाडी १३ / १९पन्हाळा २७ / ४०हातकणंगले ४१ / ७४शिरोळ २४ / ४२करवीर ४५ / ८१गगनबावडा ५ / ८राधानगरी २३ / ४६कागल १६ / ३९भुदरगड १० / २३आजरा ८ / १८गडहिंग्लज २० / ३९चंदगड ९ / २६एकूण २४१ / ४५५

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad Election: 241 & 455 Candidates in Fray.

Web Summary : Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections see 241 and 455 candidates respectively. Multi-cornered fights are expected as MahaYuti parties clash. Voting is on February 5th; campaigning intensifies. Young, middle-aged workers enter fray.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूर