Chartered Accountant: सीए अंतिम परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा फडकला; २१ विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:37 IST2026-03-03T13:34:51+5:302026-03-03T13:37:29+5:30
२६१ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी झाले सीए

Chartered Accountant: सीए अंतिम परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा फडकला; २१ विद्यार्थी उत्तीर्ण
कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल १ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेत कोल्हापूरमधील २६१ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी सीए झाले असून, जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश नोंदवले आहे.
कोल्हापूर विभागातून ओम विनोदकुमार जसुजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सौरभ तानाजी पाटील यांनी द्वितीय, तर यश मुकुंद परांजपे यांनी तृतीय क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.
याशिवाय रणजित बाबुराव घरपणकर, प्रणिल दत्तात्रय बोंगाळे, बासित आफताब खतीब, स्वप्नश्री शाम देशमुख, वैभव पंडित पाटील, निशा अनिल पोतदार, ऑस्टिन राजू नायडू, वैशाली सदाशिव दरूर, ऋषभ चंद्रकांत पाटील, श्वेता शितल पाटील, पार्थ किरण शहा, वैभवी अतुल लोखंडे, सर्वेश बाजीराव ढेरे, शिवतेज कृष्णराव पाटील, अनिकेत रामचंद्र शेटे, सुशांत संजय महेकर, आदित्य विजय कोईगडे आणि किशोर अशोक कांबळे हे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले. दरम्यान, कोल्हापूरचे रहिवासी जान्हवी समीर परुळेकर आणि आदित्य गनपुले यांनी अनुक्रमे सातारा व सांगली विभागातून परीक्षा उत्तीर्ण केली आहे.