शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पीएम किसान योजना: पंतप्रधानांचा आला थेट संदेश, पण बळिराजाचे खाते रिकामेच

By भीमगोंड देसाई | Published: March 27, 2024 12:31 PM

जिल्हा प्रशासनाने झटकले हात, शेतकरी हवालदिल

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे २००० रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आशा आहे की, आपणास शेतीच्या गरजा पूर्ण करण्यास याची मदत होईल, असा थेट पंतप्रधानांचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात दोन हजार रुपये जमा झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यासंबंधीची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करूनही लाभ मिळत नसल्याचा अनुभव आहे. परिणामी संबंधित शेतकरी महसूल आणि कृषी प्रशासनाकडे चकरा मारत आहेत. पण दोन्ही प्रशासनाकडून बेजबाबदार उत्तरे मिळत आहेत.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात दोन हजारांप्रमाणे तीन हप्ते दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीच्या पातळीवर प्रचंड गोंधळ आहे. कृषी विभाग महसूलकडे बोट दाखवते, महसूल कृषिकडे योजना असल्याचे सांगते, यामुळे सामान्य शेतकऱ्याला दोन्ही विभागाकडून न्याय मिळत नाही.

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम किसानचा १६ वा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठा गाजावाजा करून वर्ग करण्यात आला. तसा संदेशही आला. केंद्र आणि राज्य शासनाचे दोन्ही संदेश आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसल्याचे कृषी आणि महसूल प्रशासनाकडे विचारण्यासाठी जात आहेत. मात्र या दोन्ही विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा अनुभव संबंधित शेतकऱ्यांना येत आहे.

एकदा आयटी रिटर्न भरणाऱ्यांची माहिती नाही..

एकदा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही पीएम किसानचा लाभ देण्याचा आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जिल्हा महसूल प्रशासनास सहजपणे उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे या आदेशाचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या तरीही प्रशासकीय पातळीवर दिसत आहे.

पात्र असूनही वंचित ..पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेतील लाभार्थींना लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, लाभासाठीचे अडथळे सोडविण्याची जबाबदारी कोणीही घेत नाहीत. यामुळे अनेक पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीbankबँक