शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांसह वीसजणांचा जबाब पूर्ण...

By admin | Updated: December 10, 2014 23:59 IST

आमजाई व्हरवडे, पेयजल अपहार : जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उद्या अहवाल देणार

आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत झालेल्या १३ लाख ५० हजारांच्या अपहाराच्या चौकशीला सुरुवात झाली. पेयजल कमिटीतील सर्व सदस्यांसह सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह २० जणांचे जबाब राधानगरी गटविकास अधिकारी डी. एस. नाईक यांनी पूर्ण केले असून, दोन दिवसांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे हा अहवाल सादर केला जाणार आहे. या प्रकरणात सुभेदार हे कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण राधानगरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.आमजाई व्हरवडे येथील पेयजल योजनेतील ‘लोकमत’ने पर्दापाश केल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. ग्रामसेवकांनी पेयजलचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दाखला देऊन १३ लाख ५० हजार उचलण्यात हातभार लावल्याचे स्पष्ट होते.४९ लाख रुपये मंजूर झालेल्या पेयजल योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. योजनेचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत होता. पंचायत समितीच्या संबंधित विभागाला तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होते.४९ लाखांच्या कामापैकी २० लाखांचे काम अर्धवट असताना ग्रामसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने पेयजल योजनेचे काम पूर्ण झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून कामाचा सर्व्हे न करता १३ लाख ५० हजारांची रक्कम या योजनेशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीला दिली. याबाबत पेयजलच्या १४ सदस्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांना लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार सुभेदार यांनी चौकशीचे आदेश दिले होते.आठ दिवस राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांनीदेखील चौकशी करून ज्या दिवशी १३ लाख ५० हजार रुपये बॅँक आॅफ इंडियाच्या आवळी बु. शाखेतून काढले त्यावेळी कोण कोण होते, यासाठी सीसी टीव्ही फुटेजही तपासले. येत्या दोन दिवसांत हा गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सादर केला जाणार असून, या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात ग्रामसेवकांपासून अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)आता पाईप्स आल्या... मग काम पूर्ण कसे ? दरम्यान, ही योजना गेले तीन वर्षे रखडली. पाठोपाठ अपहारही चव्हाट्यावर आला. या प्रकरणात कारवाईला सामोरे जाऊ नये म्हणून अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी योजनेच्या पाईप्स ठेकेदाराने गेल्या चार दिवसांपूर्वी कामाच्या ठिकाणी आणून टाकून काम सुरू असल्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी परिस्थिती असताना ग्रामसेवकाने काम पूर्ण झाल्याचा दाखला दिलाच कसा ? हा प्रश्नही चक्रावून सोडणारा आहे.