शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

१९ जागा, शंभरावर इच्छुक

By admin | Updated: July 6, 2015 00:30 IST

आजरा तालुका संघ : निवडणूक दणक्यात होणार

आजरा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघाकरिता ९८ उमेदवारांनी १४८ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीविरूद्ध आजरा तालुका विकास आघाडी अशी थेट लढत होणार हे स्पष्ट झाले असले तरी या लढतीचाच फायदा मिळेल या उद्देशाने किमान डझनभर जादा उमेदवार रिंगणात दिसतील, असे चित्र आहे.आजरा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक ही आजरा साखर कारखाना निवडणुकीची रंगीत तालीम आहे. अवघ्या दहा महिन्यांवर आजरा साखर कारखान्याची निवडणूक आहे. कारखान्याचे सर्वच संचालक तालुका संघाच्या निवडणुकीत सक्रीय आहेत. कारखाना संचालक मंडळातील वाद जगजाहीर असल्याने याचेच पडसाद तालुका संघ निवडणुकीत उमटू लागले आहेत.आजरा विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणुकीला सामोरे जाणारी व आघाडीचे नेतृत्व करणारी बरीचशी मंडळी राष्ट्रवादीचीच आहेत. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, दिगंबर देसाई, संभाजी तांबेकर, राजू होलम, काशीनाथ तेली, महादेव पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचाच शिक्का आहे. आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल राहील, असे स्पष्ट केल्याने वरील सर्व मंडळी सध्या राष्ट्रवादीत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा बँकेमध्ये अशोक चराटी यांना छुपा पाठिंबा देणारी रवींद्र आपटे, उमेश आपटे, अंजनाताई रेडेकर इत्यादी मंडळी आपापल्या पक्षाचा झेंडा कायम ठेवून आजरा विकास आघाडीत दाखल झाली आहेत. वसंतराव धुरे, जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार, आदी मंडळी राष्ट्रवादीचा गाडा हाकत आहेत.दोन्ही आघाडीप्रमुखांनी सर्वच इच्छुकांना प्रथम उमेदवारी अर्ज भरा बाकीचे नंतर पाहू , असा संदेश दिल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. आता माघारीवेळी इच्छुकांपेक्षा आघाडीप्रमुखांची अवस्था वाईट होणार आहे. दोन्ही आघाड्यांमधून प्रमुख उमेदवारांची नावे निश्चित आहेत. अशा उमेदवारांची संख्या २५ च्या आसपास आहे. आरक्षित जागा सोडल्यास दोन्हीकडून केवळ ४-५ उमेदवार निश्चित होणे बाकी आहे.यासाठी सुमारे ५० उमेदवार इच्छुक आहेत. उमेदवारी दिली नाही म्हणून असे इच्छुक विरोधात जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पॅनेलमधील समावेशाची जबाबदारी पॅनेलप्रमुखांवर टाकली आहे. त्यामुळे पॅनेलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)हसन मुश्रीफ व के.पीं.नी विडा उचलला आजरा तालुका खरेदी-विक्री संघामध्ये राष्ट्रवादीचेच पॅनेल कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा विडा आमदार मुश्रीफ व के.पी. पाटील यांनी उचलल्याने आजरा साखर कारखान्यानंतर आजरा तालुका संघाची निवडणूक आमदार मुश्रीफ, के. पी. व संध्यातार्इंच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे.