कोल्हापूर जिल्ह्यातील १७ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 12:47 IST2024-04-27T12:47:07+5:302024-04-27T12:47:21+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ...

17 policemen of Kolhapur district were awarded the badge of the Director General | कोल्हापूर जिल्ह्यातील १७ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

कोल्हापूर जिल्ह्यातील १७ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

कोल्हापूर : जिल्ह्यातील १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे.

पोलिस दलात विविध प्रवर्गांत केलेली उत्तम कामगिरी, उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक, पोलिस पदक, शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. या वर्षी जिल्ह्यातील १५ जणांना हे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी यांना गौरविण्यात येणार आहे.

पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले, सहायक पोलिस निरीक्षक अनिल पाटील, जुना राजवाड्याचे विजय कोळी, राजेंद्र कलगुटकर, उदय शेळके, सर्जेराव पाटील, पोलिस हवालदार विष्णू गुरव, सतीश सूर्यवंशी, एलसीबीचे सचिन पाटील, राजेश गायकवाड, संदीप पाटील, बाबचाँद पटेल, वाजिद मोमिन, विनोद ढवळे, विजय जाधव आणि बटालियनचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण तांदळे यांना पदक जाहीर झाले.

Web Title: 17 policemen of Kolhapur district were awarded the badge of the Director General