शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी..वारंवार अपघात; कोल्हापूर शहरात १६ जीवघेणे स्पॉट.. जाणून घ्या

By भीमगोंड देसाई | Updated: September 17, 2025 12:58 IST

उपाय योजना प्रस्तावित : अधिकारी निश्चित, जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : वारंवार अपघात आणि वाहतूककोंडी होणारे कोल्हापूर शहरात १६ ठिकाण आहेत. परिवहन, पोलिस, महापालिका प्रशासनाने ही ठिकाणे निश्चित केली असून, उपाय योजनाही प्रस्तावित केल्या आहेत. येथील उपाय योजनांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारीही निश्चित केली आहे. शासनाच्या दीडशे दिवसांच्या उपक्रमातर्गंत या १६ ब्लॅक स्पॅाट वाहतूककोंडी मुक्त करण्यावर जिल्हा प्रशासनानेही लक्ष केंद्रीत केले आहे.शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी आणि अपघाताच्या घटना वाढत आहेत, म्हणून प्रशासनाने वारंवार गंभीर अपघात आणि दिवसांतून अनेकवेळा वाहतूककोंडी होणारी शहरातील १६ ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत. तेथे कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे, त्याचा आराखडाही तयार केला आहे.ताराराणी चौकात साईड पट्टी वाढवून डांबरीकरण करणे, पोल, युटिलिटी शिफ्ट करणे, डावी बाजू टर्न फ्री करणे, खड्डे भरणे, चौकात पट्टे मारणे, झाडांच्या फांद्या कट करणे, मुक्त सैनिक वसाहत सिग्नल चालू करणे, अतिक्रमण काढणे, तर तावडे हॉटेल चौकात सांगलीकडे जाणारा बसचा स्टॉप बदलणे, पूर्ण चौक डांबरीकरण करणे, अतिक्रमण काढणे, अशा उपाय योजना सूचित केल्या आहेत. दाभोळकर चौकात रोड मार्किंग करणे, नो पार्किंग फलक लावणे, व्हिनस चौकात रस्त्यावरील खड्डे भरणे, नो पार्किंग फलक लावणे, पट्टे मारणे, गाडी अड्डा पार्किंग सुरू करणे, रंकाळा बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप काढणे, अतिक्रमण काढणे, रंकाळा टॉवर परिसरात क्रांती मंडळाचा कट्टा काढणे, चौक रोड वन वे करणे, डी मार्ट परिसरात रंकाळा चौपाटी लगतचा फुटपाथ दुचाकी पार्किंगसाठी तयार करणे,चौपाटी गणेश मंदिर मागील ड्रेनेज ओपन आहे ते बंद करणे, डी मार्टला चुकीच्या दिशेने येऊ नये, असा फलक लावणे, फुलेवाडी पेट्रोल पंपाजवळ डिव्हायडरला रिफ्लेक्टर लावणे, स्पीड ब्रेकरला पट्टे मारणे, क्रशर चौकात साइड पट्टी मोकळे करणे, संभाजीनगर चौकात रोड मार्किंग करणे, डांबरीकरण करणे, साइड पट्ट्या भरणे आणि नंगीवली चौकात इलेक्ट्रिकल डीपी स्थलांतर करणे, वन वे करणे, अशा उपाय योजना प्रस्तावित आहेत.

बिंदू चौकात फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे..बिंदू चौकातील ब्लॅक स्पॉटवर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे, दोन नंबर शाळेजवळील ट्रान्सफॉर्मर काढणे आणि मिरजकर तिकटी परिसरात अतिक्रमण काढणे, झाडांच्या फांद्या तोडणे, रोड मार्किंग करणे अशा उपाय योजना करण्यात येणार आहे.

शहरातील ब्लॅक स्पॉटची नावे आणि कंसात अंतर असे :ताराराणी चौक ते तावडे हॉटेल (एक किलोमीटर), दाभोळकर चौक ते ताराराणी चौक (एक किलोमीटर), दाभोळकर चौक ते व्हिनस कॉर्नर (५०० मीटर), रंकाळा बसस्थानक ते डी मार्ट (५०० मीटर), डीमार्ट ते फुलेवाडी फायर स्टेशन (५०० मीटर), फुलेवाडी नाका (५० मीटर), नवीन वाशी नाका ते क्रशर चौक, क्रशर चौक ते जुना वाशी नाका (प्रत्येकी ५०० मीटर), साई मंदिर चौक कळंबा ते आयटीआय कॉलेज, संभाजीनगर चौक ते नंगीवली चौक, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम चौक ते रेणुका मंदिर चौक (प्रत्येकी ५०० मीटर), राजेंद्रनगर ते सुभाषनगर चौक (८०० मीटर), सायबर चौक ते एनसीसी चौक (६०० मीटर), शांतिनीकेतन शाळेजवळ (५०० मीटर), कोयास्को चौक ते केएसबीपी पार्क (एक किलोमीटर).