शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

शैक्षणिक खर्चात दहा वर्षांत १५० टक्के वाढ

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

‘अ‍ॅसोचेम’च्या अहवालातील निष्कर्ष : पगारातील ४० टक्के वाटा मुलांच्या शिक्षणावर खर्च

इग्रजी माध्यमांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले असून याचे लोण आता ग्रामीण भागातदेखील पोहोचले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा श्रीमंत किंवा नवश्रीमंतांना आकर्षित करीत आहेत. गेल्या दहा वर्षांत खासगी शाळांच्या फीमध्ये तब्बल १५० टक्के वाढ झाल्याचे अ‍ॅसोचेम संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. पालकांचा एक अपत्याकडे कल वाढण्यामागे वाढता शैक्षणिक खर्च हे एक कारण ठरत आहे.शैक्षणिक खर्च वाढत असला तरी सरकारी शाळांचा घसरणारा दर्जा आणि अनुकरणप्रियता यामुळे शहरी आणि निमशहरी भागातील पालकांचा ओढा आपल्या पाल्यांना खासगी शाळामध्ये घालण्याकडेच आहे. शैक्षणिक खर्च वाढत असला तरी पालकांचे उत्पन्न मात्र त्या तुलनेत वाढत नाही. परिणामी आरोग्य आणि इतर आवश्यक गरजाची पूर्तता करताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुलांचा शाळेचा खर्च झपाट्याने वाढत असून गेल्या १० वर्षांत यात १५० टक्क्यांची वाढ झाल्याचे अ‍ॅसोचेमने म्हटले आहे. अ‍ॅसोचेम सोशल डेव्हलपमेंट फौंडेशनने (एएसडीएफ) केलेल्या ‘वाढत्या शैक्षणिक खर्चाचा पालकांवर भार’ या पाहणीत असे आढळून आले की, २००५ मध्ये मोठ्या शहरात खासगी शाळांची शैक्षणिक फी ५० हजाराच्या आसपास होती. ती २०१५ मध्ये १ लाख २५ हजारपर्यंत (वार्षिक) पोहोचली आहे, तर निमशहरी भागात १० हजारांवरून तब्बल ७० ते ९० हजारांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल-मे २०१५ दरम्यान देशातल्या प्रमुख शहरांतील १६०० पेक्षा जास्त पालकांच्या मुलाखती घेत ही पाहणी करण्यात आली. यावेळी १० पैकी ९ पालकांनी शैक्षणिक खर्चाची जुळवाजुळव करणे अतिकठीण बनत असल्याचे मान्य केले. अनेकवेळा अवाढव्य खर्चामुळे आपल्या मनातील शाळेवर पाणी सोडावे लागते, असे मत १० टक्के पालकांनी व्यक्त केले, तर जवळपास ७० टक्के पालकांनी आपल्या पगारातील जवळपास ३० ते ४० टक्के रक्कम ही शिक्षणावर खर्च होत असल्याचे सांगितले. याचा परिणाम कुटुंबाच्या एकूण बजेटवर होत आहे. वाढलेल्या खर्चात गणवेश, पुस्तके, स्टेशनरी, वाहतूक, खेळाच्या घडामोडी, शालेय सहली, शालेय मदत आदी गोष्टींचा समावेश होतो.महागाईचा विचार केल्यास शिक्षणाचा खर्च महागाई दराच्या दुप्पट वेगाने वाढत आहे. वाढीचा हा वेगच चिंतेचा विषय असून शिक्षण हे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाण्याची लक्षणे आहेत. ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना शैक्षणिक खर्चाचा फार मोठा फटका बसत आहे.पाहणीत असे दिसून आले की, खर्च वाढण्यात प्रामुख्याने विशिष्ट गणवेशांची सक्ती, ब्लेझर, पुलओव्हर अशा प्रकारचे पाश्चात्त्य गणवेश, एकाच विक्रेत्याकडून खरेदीसाठी शाळांचा दबाव याचा एकंदरीत परिणाम खर्चावर पडत आहे. शाळा आणि विक्रेत्यांमधील युतीमुळे पालकांना अवास्तव पैसे खर्च करावे लागत आहेत. वााढणारी ट्युशन फी, वाहतूक खर्च, विकासनिधी, विविध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पैशामुळे कुटुंबाला वार्षिक सुटी, घरातील काम आणि इतर खर्चावर पाणी सोडावे लागत असल्याचे मत ८० टक्के पालकांनी व्यक्त केले.