शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागातील १३० अधिकारी जाळ्यात!

By admin | Updated: July 9, 2015 21:32 IST

शिरीष देशपांडे : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी सुरू

सांगली : महसूल, महापालिका, पोलीस, आरटीओ, पाटबंधारे यांसह अन्य शासकीय कार्यालयांतील पुणे विभागातील सुमारे १३० अधिकारी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत, अशी माहिती या विभागाचे अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे यांची मे २०१५ मध्ये ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या नांदेड विभागातून पुणे विभागात बदली झाली आहे. अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर देशपांडे पहिल्यांदाच गुरुवारी सांगलीत आले होते. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांमध्ये चांगली जागरूकता निर्माण झाली आहे. यातून तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांत पुणे विभागात १२६ जणांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. गतवर्षी ही संख्या १०२ होती. यामध्ये पुणे ४८, सातारा १७, सांगली १९, सोलापूर २७ व कोल्हापूर १६ अशी कारवाईची आकडेवारी आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागाची आहेत. देशपांडे म्हणाले की, लाच घेताना सापडलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामधील साक्षीदारांवर लक्ष ठेवून आहोत. जुन्या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पोलीस दलातील जे वरिष्ठ अधिकारी लाच घेताना सापडले होते, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारली आहे. याविरुद्ध आम्ही राज्याच्या गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे अपील केले आहे. लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्याच्या कारवाईत वाढ होत असताना, बहिशेबी मालमत्ता जमविणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धही तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. पुणे विभागातील १३० अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये गोपनीय ७० व उघड ६० चौकशी प्रकरणांचा समावेश आहे.