शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १२ संचालकांचे राजीनामे, कोल्हापूर जिल्हयात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 11:17 IST

कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत संचालकांनी आपले राजीनामे दिले.

गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान १२ संचालकांनी अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून आपल्या संचालकपदाचे राजीनामे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ.एस.एन. जाधव यांच्याकडे शुक्रवारी (२१) दिले. त्यामुळे लवकरच कारखान्यावर प्रशासक येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

२०१६ मध्ये तत्कालिन आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, श्रीपतराव शिंदे, संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी, तत्कालिन मंत्री चंद्रकांत पाटील, संजय घाटगे, प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काळभैरी शेतकरी विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात तिरंगी चुरशीची लढत झाली होती. त्यात शेतकरी आघाडीला ११ तर काळभैरी आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, २०१३ मध्ये १० वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर कारखाना चालवायला घेतलेल्या 'ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनी'ने ९ महिन्यांपूर्वी कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडला. उणे नक्त मूल्यामुळे कोणत्याही वित्तीय संस्थांकडून कर्ज न मिळाल्याने विविध संस्थांकडून ठेवीच्या स्वरूपात भांडवल उभे करून अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी कारखाना स्वबळावर सुरू केला आहे.

दरम्यान, आठवड्यांपूर्वीच त्यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी 'वेगळी भूमिका' घेतली होती. शुक्रवारी,त्यांनी थेट संचालकपदाचे राजीनामेच दिले. राजीनामे दिलेल्या संचालकांत विरोधी आघाडीचे प्रमुख डॉ. शहापूरकर यांच्यासह अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, प्रकाश पताडे, क्रांतीदेवी कुराडे, सत्ताधारी आघाडीचे सतीश पाटील, दीपक जाधव, विद्याधर गुरबे, जयश्री पाटील यांचा समावेश आहे.

अध्यक्ष शिंदे यांच्या बाजूने

केवळ ६ संचालक आहेत. त्यात उपाध्यक्ष नलवडे, अमरसिंह चव्हाण, बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट व संभाजी नाईक यांचा समावेश आहे.

अध्यक्ष शिंदेंच्यावरील आरोप

अध्यक्ष शिंदे यांनी संचालकांना विश्वासात न घेता बेकायदेशीर ठरावाव्दारे मनमानी कारभार केला आहे. फायदे - तोटे विचारात न घेता त्यांनी केवळ राजकीय व आर्थिक स्वार्थासाठीच कारखाना विलंबाने सुरू केला. सभासदांचा ऊस न आणता कर्नाटकातील उतारा नसलेला ऊस आणल्यामुळे कारखाना तोट्यात जात आहे. त्यांच्या मनमानीमुळे यापूर्वीही संचालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे २५ डिसेंबर, २०२१ नंतरच्या त्यांच्या कोणत्याही निर्णयास आम्ही जबाबदार नाही,असे निवेदनही १२ संचालकांनी प्रसिद्धीला दिले आहे.

आरोप केवळ व्यक्तिव्देषातूनच

आपण कोणतीही गोष्ट चुकीची व बेकायदेशीर केलेली नाही. ५ वर्षे कारखाना''ब्रिस्क कंपनी''कडेच होता. कंपनीने अचानक कारखाना सोडल्यामुळे आपदधर्म म्हणून ताब्यात घेतला.अर्थसाहाय्य उपलब्ध होण्यात अडचणी आणल्यामुळेच कांही संस्थांकडून ठेवी घेऊन कारखाना पावणे चार कोटीत स्वबळावर सुरू केला आहे. आजअखेर २२ दिवसांत ५२ हजार टन ऊसाचे गाळप करून ५५ हजार क्विंटल साखर आणि १ लाख ४० हजार लिटर्स स्पिरीटचे उत्पादन घेतले आहे.दोन्हीचे मिळून एकूण सुमारे १९ कोटी रुपये उत्पन्न होते.परंतु, यापुढे गळीतावर परिणाम झाल्यास त्याला १२ संचालकच जबाबदार राहतील. आपल्यावरील सर्व आरोप केवळ व्यक्तिव्देषातूनच केले आहेत.आता सूज्ञ सभासद, शेतकरी व कामगारच त्याला चोख उत्तर देतील. - ॲड.श्रीपतराव शिंदे, अध्यक्ष, गडहिंग्लज कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने