कोल्हापुरातील कळंबा तलावावर १०५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर

By संदीप आडनाईक | Updated: January 10, 2025 15:44 IST2025-01-10T15:44:36+5:302025-01-10T15:44:58+5:30

बर्डस ऑफ कोल्हापूरचा सहावा हंगाम : १९ स्थलांतरित प्रजाती, ८६ रहिवासी प्रजातींची नोंद

105 species of birds flock to Kalamba Lake in Kolhapur | कोल्हापुरातील कळंबा तलावावर १०५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर

कोल्हापुरातील कळंबा तलावावर १०५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर

कोल्हापूर : बर्डस ऑफ कोल्हापूर आयोजित कोल्हापूर पक्षी गणनेच्या सहाव्या हंगामातील पक्षी गणना कळंबा तलावावर झाली. या गणनेत १०५ प्रजातींच्या ११६१ पक्ष्यांचा वावर असल्याची नोंद झाली. यात १९ स्थलांतरित प्रजाती, ८६ रहिवासी प्रजातींची नोंद केली आहे.

बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, पृथ्वीराज सरनोबत, सतपाल गंगलमाले, मंदार रुकडीकर, ऋतुजा पाटील, प्रणव दातार यांनी ही गणना केली. यात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ पक्षीमित्रांनी सहभाग घेतला होता. रविवार दि. १२ जानेवारी रोजी पुढील पक्षी गणना राजाराम तलावावर होणार आहे.

स्थलांतरित पक्षी : कॉमन ग्रीनशँक (हिरव्या पायाचा तुतवार), ग्रीन सँडपायपर (हिरवी तुतारी), वूड सँडपायपर (ठिपकेवाली तुतारी), कॉमन सँडपायपर (सामान्य तुतारी), टेमींक्स स्टिंट (टेमींकचा टीलवा), ब्राउन श्राइक (तपकीरी खाटीक), एशी ड्रोंगो (राखाडी कोतवाल), रोजी स्टारलिंग (पळस मैना), रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर (लाल छातीचा माशीमार), वर्डीटर फ्लायकॅचर (निलांग), क्लेमरस रीड वॉब्लर (बडबड्या बोरु वटवट्या), ब्लिथस रीड वॉब्लर (ब्लिथचा बोरू वटवट्या), साईक्स वॉब्लर (साईक्सचा वटवट्या), बुटेड वॉब्लर (पायमोज वटवट्या),लेसर व्हाईटथ्रोट (छोटा शुभ्रकंठी), कॉमन चीफचॅफ (सामान्य चिपचीप), ट्री पीपीट (वृक्ष तिरचिमणी), वेस्टर्न यल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी)

आययूसीएन संकटग्रस्त यादीतील प्रजाती : इंडियन रिव्हर टर्न (नदी सुरय), वुली नेक स्टोर्क (पांढऱ्या मानेचा करकोचा), पैंटेड स्टोर्क (चित्रबलाक)

पुरेसे अन्न, अधिवास नसल्यामुळे स्थलांतरित बदकांनी कळंबा तलावाकडे अजूनही पाठ फिरवली आहे. २०१५ मध्ये कोरडा पडल्यानंतर कळंबा तलावाची जलसृष्टी अजूनही सुधारलेली नाही. भौतिक विकासाबरोबर तलावाला नैसर्गिक विकासाची पण गरज भासत आहे. -प्रणव देसाई, बर्डस ऑफ कोल्हापूर.

Web Title: 105 species of birds flock to Kalamba Lake in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.