शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. प्रवासातही जीवाला होतेय धाकधूकच; कोल्हापुरात वर्षभरात १०० अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:37 IST

दहा ठार, ७९ प्रवासी जखमी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करण्यात येते. तरीही एसटीचे अपघात वाढतच चालले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात अपघातांनी शंभरी गाठली आहे. गंभीर अपघातात १० जणांना जीव गमवावा लागला आहे तर ७९ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची संख्या वाढत असल्याने प्रवाशांची धाकधूक वाढतच आहे.

प्रवास खरंच किती सुरक्षित ?एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र, अपघाताची संख्या वाढत असल्याने एसटीचा प्रवास सुरक्षित राहिला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

१० ठार, ७९ जखमीवर्षभरात किरकोळ, गंभीर, प्राणांतिक असे एकूण १०० अपघात झाले आहेत. गंभीर अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ७९ जण जखमी झाले आहेत.

वारसांना १ कोटींची नुकसानभरपाईअपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सुमारे १ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. प्रत्येकी दहा लाखांचा विमा प्रवाशांचा उतरवला जातो.

अभियान, प्रशिक्षण देऊनही अपघात कमी होईनाएसटीचे अपघात कमी होण्यासाठी वर्षभर चालक, वाहकांसाठी अभियान राबवले जाते. त्यासाठी तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात कर्तव्यावर अपघात संख्येत वाढ होत आहे.

तिकिटातल्या १ रुपयातून प्रवाशाचा विमाएसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना’ राबवली जाते. त्याअंतर्गत तिकिटाच्या दरात केवळ १ रुपया अतिरिक्त घेऊन १० लाखांपर्यंतचा विमा मिळतो.

चालकांची दरवर्षी होते आरोग्य तपासणीकोल्हापूर विभागात चालकांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. डोळे तपासणीसह सर्व प्रकारच्या चाचण्या होतात. त्यात दोषी आढळल्यास तातडीने उपचार केले जातात.

कोणत्या महिन्यात किती अपघात?महिना / अपघातजानेवारी / ८फेब्रुवारी / ५मार्च / १०एप्रिल / १०मे / १०जून / ९जुलै / ७ऑगस्ट / ७सप्टेंबर / १०ऑक्टोबर / ८नोव्हेंबर / ९डिसेंबर / ७एकूण १००

कोल्हापूर विभागात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चालक-वाहकांचे प्रबोधन, प्रशिक्षण दिले आहे. - अभय देशमुख, विभाग नियंत्रक

English
हिंदी सारांश
Web Title : Fear Lingers on ST Bus Journeys: 100 Accidents in Kolhapur

Web Summary : Despite safety campaigns, ST bus accidents in Kolhapur persist. A hundred accidents occurred in a year, resulting in 10 deaths and 79 injuries, raising passenger concerns. Compensation of ₹1 crore was given to victims' families.