शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील ६० वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

आजरा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय व २७ उपकेंद्रामधून कोरोनाची लस देण्याचे काम आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर ...

आजरा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय व २७ उपकेंद्रामधून कोरोनाची लस देण्याचे काम आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनीही यासाठी प्रतिसाद देण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरण पूर्ण झाल्यास धोका टाळता येऊ शकतो. सलग दोन वर्षे सर्व व्यवहार कोरोनामुळे ठप्प झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाची लस घ्यावी, असेही आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. आजरा शहरात प्रत्येक प्रभाग व गल्लीनिहाय कोरोनाची लस देण्याचे काम सुरू आहे. आजरा तालुक्यात १८ ते ४५ वयोगटांतील कोरोनाचा पहिला डोस घेतलेले २५,१८९, तर दुसरा डोस २६८३ जणांनी घेतला आहे. ४५ ते ६० वयोगटांतील १८४९८ नागरिकांनी पहिला डोस, तर १५५२८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

६० वर्षांवरील जवळपास ३७ हजार लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. तालुक्यात पहिला डोस घेतलेले ६५ हजार, तर दुसरा डोस घेतलेले ३४ असे एकूण ९९ हजार नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोनाची पहिल्या वर्षी १००४, तर चालूवर्षी ४२८३ लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह ५२८७ पैकी १३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. ५१५१ नागरिकांवर वेळेत उपचार झाल्याने ते बरे होऊन घरी परतले. सध्या कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात भीती राहिली नाही. मात्र, कोरोनाचे रुग्ण अद्यापही सापडत आहेतच.

.. दोन वर्षांत कोरोनाने १३६ जणांचा मृत्यू

कोरोनाने गेल्या वर्षात ४८ जणांचा, तर चालू वर्षात ८८ जणांचा असे एकूण १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे ही कुटुंबे कोरोनातून सावरलेली नाहीत. तालुक्यात अध्यापही कोरोनाचे सावट आहेच.