मोपेडच्या डिकीतील १ लाख १२ हजाराचे मोबाईल हॅडसेट चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:16 IST2019-03-28T14:15:04+5:302019-03-28T14:16:46+5:30

मोपेडच्या डिकीतून सुमारे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सुमारे ९९ मोबाईल हॅडसेट अज्ञाताने चोरीला गेल्याची घटना सरनोबतवाडी येथे घडली.

1 million 12 thousand mobile handset stolen in Moped Diki | मोपेडच्या डिकीतील १ लाख १२ हजाराचे मोबाईल हॅडसेट चोरी

मोपेडच्या डिकीतील १ लाख १२ हजाराचे मोबाईल हॅडसेट चोरी

ठळक मुद्देमोपेडच्या डिकीतील १ लाख १२ हजाराचे मोबाईल हॅडसेट चोरीकणेरीवाडीजवळ ट्रकची चोरी

कोल्हापूर : मोपेडच्या डिकीतून सुमारे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सुमारे ९९ मोबाईल हॅडसेट अज्ञाताने चोरीला गेल्याची घटना सरनोबतवाडी येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, आदित्य श्रीकांत भोसले (वय १९ रा. प्लॉट नं. १४, प्रगती कॉलणी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) हे सरनोबतवाडी येथे पार्कीगमध्ये आपली मोपेड लावून समोरील हॉटेलसमध्ये गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोपडच्या डिकीतून सुमारे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल हॅडसेट चोरुन नेले.

यामध्ये अ‍ॅपल आय फोन एक्स मोबाईल हॅडसेट, जुवाकिस, सॅमसंग एस ९ प्लस, विवो व्ही ९, ओपो ए ७१, लावा झेड १६ मोबाईल हॅडसेटचा समावेश आहे. याबाबत आदित्य भोसले यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कणेरीवाडीजवळ ट्रकची चोरी

पुणे ते बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी (ता. करवीर) येथे हॉटेल जयहिंद शेजारी रस्त्याच्या कडेला लॉक करुन पार्कीग केलेल्या ट्रकची चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकिस आली.

कणेरीवाडी नजीक महामार्गावर राहूल बबन डोंबे (रा. देवुळगाव गाडा दत्तवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी आपल्या मालकीचा ट्रक रस्त्याच्या कडेला पार्कीग करुन उभा केला होता. त्यावेळी अज्ञाताने मंगळवारी रात्री तो ट्रक चोरुन नेला. ही घटना बुधवारी उघडकिस आली. याबाबत डोंबे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Web Title: 1 million 12 thousand mobile handset stolen in Moped Diki