शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विभागात ६० लाख टन ऊस उत्पादन घटणार : महापुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:08 IST

यंदाच्या हंगामात ६० लाख ६१ हजार ९० टनांनी उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसणार आहे.

ठळक मुद्दे७० हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित : साखर विभागाचा अहवाल

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जुलै-आॅगस्ट महिन्यांत आलेल्या महापुराने झालेले उसाचे नुकसान व उत्पादनात होणाऱ्या घटीचा अहवाल साखर विभागाने आयुक्तांकडे पाठविला आहे. महापुरात विभागात ७० हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने यंदाच्या हंगामात ६० लाख ६१ हजार ९० टनांनी उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसणार आहे.

यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी महापुराचे सावट हंगामावर आहे. साखर विभागाने कारखानानिहाय पूरबाधित उसाची आकडेवारी संकलित केली असून, यामध्ये उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार हे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर विभागातील सात लाख ३२ हजार ९५ हेक्टर पैकी ७० हजार ९४६ हेक्टर क्षेत्र हे पूरबाधित आहे. सर्वाधिक ५३ ंहजार ३५३ हेक्टर हे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील असून, १७ हजार ५९३ हेक्टर हे सांगली जिल्ह्यातील आहे. उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने पाहिले तर साहजिकच कोल्हापूरला ३५ लाख ९ हजार २४९ टनांचा फटका बसू शकतो.‘क्रांती’ला सर्वाधिक फटकाक्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल या कारखान्याचे एकूण १२ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल १९९४ हेक्टर पूरबाधित आहे. पूरबाधित क्षेत्र कमी असले तरी यातील ५० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ हुपरी (ता. हातकणंगले) जवाहर कारखान्याचे २३ हजार ४९५ हेक्टरपैकी ११ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र पूरबाधित आहे.‘वारणा’, ‘ंमंडलिक’चे तुलनेने नुकसान कमीविभागातील इतर कारखान्यांना पुराचा ज्या प्रमाणात फटका बसला, त्या प्रमाणात तात्यासाहेब कोरे वारणा व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याला बसलेला अहवालात दिसत नाही. हातकणंगले व शिरोळमधील इतर कारखान्यांच्या तुलनेत ‘शरद’चे क्षेत्र कमी असून, त्यांना ५१ हजार टनांचा फटका बसेल.कारखानानिहाय पूरबाधित क्षेत्र व घटणारे उत्पादन-कारखाना एकूण क्षेत्र हेक्टर बाधित क्षेत्र ऊस उत्पादनात घटणारभोगावती ९०९५ २,०६० १,८१,९००राजाराम ६६४४ १,०१२ १,१९,५९२शाहू १३,९३५ २,५८५ १,३९,३५०दत्त-शिरोळ ११,८९२ ३,७३२ ३,६८,६५२बिद्री ११,४०२ २,०४५ १,१४,०२०नलवडे - हरळी ६,८४९ १,२२४ ४७,९४३जवाहर २३,४९५ ११,५२५ ५,८७,३७५कुंभी ९,८७० २,९५५ १,४८,०५०पंचगंगा-इचलकरंजी १५,०४५ ५,५६० ३,७६,१२५शरद-नरंदे ८,५५९ २,२२९ ५१,३५४आजरा ७,५९० १,६०० ७५,९००गायकवाड ४,००० ९११ ६०,०००डी. वाय. पाटील ८,२०१ १,२३० ५७,४०७गुरुदत्त-टाकळीवाडी ८,१८० १,६०९ १,६३,६००इको केन-म्हाळुंगे ९,५६५ २,३९२ ९५,६५०हेमरस - राजगोळी १२,१९९ १,८९० १,०९,७९१महाडिक शुगर्स-फराळे ६,७६६ १,३५३ ३३,८३०संताजी घोरपडे ११,५२५ २,३०० २,५३,०५०दालमिया -आसुर्ले १७,९८४ ३,७०० २,६९,७६०इंदिरा-तांबाळे ८,५३० १,३६० २,५५,९००किसन अहिर-वाळवा ८,३०९ ९,४९ १,२४,६३५राजारामबापू-साखराळे ११,७५४ २,९१४ १,७६,३१०राजारामबापू-वाटेगाव ६,४५१ ६,८९ ८३,८६३राजारामाबापू-कारंदवाडी ५,६६८ १,३२४ ९०,६८८मोहनराव शिंदे ९,४४३ १,९४१ १,२२,७६९विश्वासराव नाईक ९,३१८ १,८३८ १,३९,७७०क्रांती-कुंडल १२,७४६ १,९९४ ६,३७,३००सोनहिरा-वांगी १६,१७२ २,५६२ १,३६,४९१वसंतदादा-सांगली १५,६२५ २,२३० १,०९,३७५उदगिरी शुगर-खानापूर १२,३७७ १,१५१ २,४७,५४० 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने