भिवंडीत धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार

By नितीन पंडित | Updated: July 14, 2023 18:17 IST2023-07-14T18:00:33+5:302023-07-14T18:17:02+5:30

भिवंडी तालुक्यातील खोणि ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार परिसरात गौसिया मस्जिद जवळ अब्दुला फक्की यांच्या मालकीची जीर्ण झालेली इमारत

Woman killed in dangerous building collapse in Bhiwandi | भिवंडीत धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार

भिवंडीत धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार

नितीन पंडित 

भिवंडी : शहरा नजीकच्या खोणी ग्रामपंचायतीतील खाडीपार येथे एका धोकादायक इमारतीच्या  सज्जाचा काही भाग कोसळून या दुर्घटनेत त्या ठिकाणाहून जाणारी पादचारी महिला ठार झाली असल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली आहे.शहनाज जहीर अन्सारी वय ५५ वर्ष असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.          

भिवंडी तालुक्यातील खोणि ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार परिसरात गौसिया मस्जिद जवळ अब्दुला फक्की यांच्या मालकीची जीर्ण झालेली इमारत असून ग्रामपंचायत प्रशासनाने इमारत धोकादायक ठरविल्याने रिकामी केली होती.शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्याने या इमारतीच्या गच्चीचा सज्जा कोसळला.त्याच सुमारास नजीकच्या डोंगरकर मस्जिद ट्रस्ट च्या चाळीत राहणारी महिला शहनाज जहीर अन्सारी ही या इमारती खालून जात असताना तिच्यावर हा ढिगारा कोसळल्याने महिलेच्या डोक्यास जबर मार लागून त्यामध्ये महिला जागेवरच गतप्राण झाली.या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार व ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी महिलेला ढीगाऱ्या खालून काढले व तिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी रवाना केला.व घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून केली आहे.

Web Title: Woman killed in dangerous building collapse in Bhiwandi