कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण?

By मुरलीधर भवार | Updated: November 28, 2022 16:04 IST2022-11-28T16:03:30+5:302022-11-28T16:04:48+5:30

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवरील एका चौकात रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नग्न अवस्थेत बसली हाेती. तिच्या समाेर तिने  शंख, वाटी, हळीद कुंकू ठेवले हाेते.

Who is that person who performs witchcraft at in Kalyan at night | कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण?

कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण?

कल्याण - रात्रीच्या वेळी भर चौकात एका नग्न अवस्थेत व्यक्तीने जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.  त्याच्याकडे जादूटोणा करण्याचे साहित्य  कुठून आणि कसे आले याचा तपास लागला पाहिजे, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. 

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवरील एका चौकात रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नग्न अवस्थेत बसली हाेती. तिच्या समाेर तिने  शंख, वाटी, हळीद कुंकू ठेवले हाेते. हातात चाकू घेतला हाेता. आग पेटवून ताे त्याठिकाणी काही तरी करीत होता. हे पाहून बघ्यांची एकच गर्दी त्याठिकाणी जमली. हा सर्व प्रकार घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी समीर वानखेडे यांनी तात्काळ बाजरपेठ पोलिसांना हा प्रकार कळविला. 

पोलिस तात्काळ घटनास्थळी आले. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आधी तो हाफ पॅण्ट वर होता. या व्यक्तीला चिडविल्याने तो चिडून हा प्रकार करीत होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र हा व्यक्ती कोण आहे. त्याच्याकडे जादू टोण्याचे साहित्य कुठून आले. हा मनोरुग्ण आहे तर त्याला हे सगळे करण्याची गरज काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा संशय़ व्यक्त केल्याने पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
 

Web Title: Who is that person who performs witchcraft at in Kalyan at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.