शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अन्यत्र सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:26 IST

गल्लोगल्लीच्या दादा, भाईंना आवर काेण घालणार : कारवाईत सातत्य राखणे गरजेचे

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कल्याण - डोंबिवली शहरांत राजरोस बेकायदा बांधकामे फोफावली आहेत. दत्तनगर येथील सरकारी जागेवर असलेल्या एका बेकायदा बांधकामावर सुरू असलेल्या कारवाईला परिसरातील काही गुंड लोकांनी विरोध केला. थेट पालिकेच्या पोकलेनची हवा काढून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेली. गल्लोगल्लीतल्या या दादा, भाईंच्या गुंडप्रवृत्तीवर महापालिका कशी अंकुश मिळवणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.शहरात गोग्रासवाडी परिसरात अंबिकानगरमध्ये आणि दत्तनगर भागात अन्यत्रही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. काही ठिकाणी नागरिक राहायलाही गेले आहेत. त्यामुळे आता कारवाई होणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे. पश्चिमेलाही शाळेसाठी आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम झाले होते. त्यावर तत्कालीन प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कारवाई केली होती. पण, ती इमारत पूर्ण जमीनदोस्त करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली होती. अधिवेशन काळात पालिकेने सगळ्या प्रभागांत अशा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली होती. पण, पुन्हा ती कारवाई थंडावली. २७ गावांतही अशी बांधकामे उभी राहात आहेत. तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी काढलेल्या आदेशानंतर कारवाई कागदावरच राहिली. वर्षभरात सर्वत्र अगदी हाताच्या बाेटांवर मोजता येतील, एवढ्याच कारवाया झाल्या आहेत. त्या तुलनेत अशा बांधकामांचे मजलेच्या मजले उभे राहात असल्याने कारवाईचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येते.महापालिकेच्या १५ ते २० वर्षांत पहिल्यांदा दत्तनगर येथील बेकायदा बांधकाम हे रात्रभर कारवाई करून २२ तासानंतर जमीनदोस्त करण्यात आले. याबद्दल कारवाईतील सर्व अधिकाऱ्यांचे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या भूमिकेबद्दल समाधान, कौतुक व्यक्त होत आहे. अशा कारवाया सातत्याने होत राहाणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.अग्यार समितीने अधोरेखित केलेली ३७ हजार ९२० बांधकामे, तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांनी सांगितलेली २७ गावांतील ७९ हजारांहून अधिक बांधकामे, त्यानंतरची सुमारे एक लाख अशी एकंदरीत दोन लाखांहून अधिक बांधकामे या महापालिका हद्दीत उभी आहेत. या सगळ्या प्रकरणांचे काय करणार? एक ते दोन कारवाया करून काहीही होत नाही. खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून राजरोस बांधकामे उभी राहात आहेत. खरेतर, ज्या प्रभागात अशी कामे होतात तेथील नगरसेवक, पोलीस अधिकारी आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी हे सगळे त्या कामांना जबाबदार धरले पाहिजेत; पण तसे होत नाही ही या शहरांची शोकांतिका आहे.    - कौस्तुभ गोखले, माहिती     अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका