कल्याण वालधुनी ब्रिजजवळ रेल्वे रुळावर ट्रक अडकला, काही काळ वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 21:12 IST2022-01-15T21:12:39+5:302022-01-15T21:12:58+5:30
Kalyan News: कल्याण-विठ्ठलवाडी वालधुनी रेल्वेट्रॅक कल्याण येथे गेट नंबर ०१/ए जवळ एक ट्रक रेल्वेट्रॅकवर बंद पडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी घडली. त्या घटनेमुळे कल्याण अंबरबाथ मार्गातील वाहतूक बंद ठप्प झाली होती.

कल्याण वालधुनी ब्रिजजवळ रेल्वे रुळावर ट्रक अडकला, काही काळ वाहतूक ठप्प
डोंबिवली - कल्याण-विठ्ठलवाडी वालधुनी रेल्वेट्रॅक कल्याण येथे गेट नंबर ०१/ए जवळ एक ट्रक रेल्वेट्रॅकवर बंद पडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी घडली. त्या घटनेमुळे कल्याण अंबरबाथ मार्गातील वाहतूक बंद ठप्प झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्या घटनास्थळी कल्याण रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने जाऊन एका क्रेन सहाय्याने तो ट्रक संध्याकाळी ५.५० वाजता बाहेर काढण्यात आला. सुमारे अर्धा तास तो ट्रक बाजूला करण्याचे काम चालू होते. त्यानंतर कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी शार्दूल यांनी दिली