शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

By अनिकेत घमंडी | Updated: June 6, 2024 06:46 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच माझ्याही कामाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. कल्याण लोकसभा क्षेत्रात कळवा ते अंबरनाथ दरम्यान रेल्वेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. त्यात अपघातग्रस्त प्रवाशांना अनेकदा गोल्डन अवरमध्ये उपचार मिळत नाहीत. जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नागरिकांच्या मनोरंजनासाठी काय? ठाकुर्ली, कल्याण पूर्व, अंबरनाथ येथे सरकारी भूखंडावर आबालवृद्ध नागरिकांसाठी मोकळी सुसज्ज जागा, मनोरंजन पार्क करण्यात येईल. त्यादृष्टीने पालिका यंत्रणांसमवेत नियोजन करण्यात येईल.

पाणी समस्या कशी सोडविणार?   पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात एक धरण बांधण्यात येणार असल्याने त्याद्वारे येथील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. 

जिल्ह्यातील रक्त तुटवड्यावर काय उपाययोजना?   जिल्ह्याला भेडसावणारा रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी सुसज्ज रक्तपेढी निर्माण करून शक्यतो विनामूल्य तत्त्वावर ती चालवून गरजूंची गैरसोय दूर करण्याचा मानस आहे. 

कोस्टल रस्त्याची संकल्पना काय आहे?  कळवा ते कल्याण रेल्वेमार्गाला समांतर खाडीकिनारा आहे. या किनाऱ्यांचा विकास करून रेल्वेला समांतर असा ठाणे- कळवा ते कल्याण समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. सध्या कल्याण ते डोंबिवली आधीच रस्ता तयार असून त्यातील तांत्रिक अडथळे दूर करून तो रस्ता पुढे दिवा, मुंब्रा मार्गे कळव्यापर्यंत नेण्यात येईल. 

डोंबिवलीतील शहरांतर्गत वाहतूककोंडीचे काय? डोंबिवलीत रस्ते अरुंद आहेत. त्यावर उपाय म्हणून टंडन रस्त्यावरून थेट दावडी नाक्यापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल. त्याच पद्धतीने पश्चिमेलाही थेट माणकोलीपर्यंत पूल करून वाहनांचा वेग वाढवण्याचे नियोजन असेल. ठाकुर्लीतून ९० फूट रस्त्याला जोडणारा पूलही तयार केला जाईल. बदलापूर पाइपलाइन रस्त्याची कोंडी सोडवण्यासाठी तेथेही पूल बांधण्याचे नियोजन आहे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे काय नियोजन केले जाईल? बदलापूर ते ठाणे हद्दीत एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करून परवडणाऱ्या दरात बस सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरामदायी सेवा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याची अंमलबजावणी करणार आहे.

टॅग्स :kalyan-pcकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४