कल्याण: खडवली परिसरातील जू गावात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी आरोपी योगेश एकनाथ राणे ( ४०) याला अटक केली आहे. योगेशला अटक करुन कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ मे पर्यंत पेलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.
उन्हाचा तडाखा असल्याने खडवली नदीवर अनेक जण अंघोळीसाठी येतात. खडवली नदी ही उन्हाळी सहलीसाठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी योगेश राणे आणि राजू प्रभुळकर हे २० एप्रिल रोजी आले होते. अंघोळ झाल्यावर कपडे धुताना योगेश याने राजू याच्याकडे त्याचे पैसे ठेवण्यासाठी दिले होते. योगेशला राजूने पैसे परत न करता तो तसाच निघून जात होता. या कारणारुन योगेश आणि राजू यांच्यात वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या योगेशने राजूच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी योगेशने राजूचा मृतदेह खडवली परिसरातील जू गावच्या हद्दीत लांब ठिकाणी फेकून दिला.
राजूचा मृतदेह आढळून आल्यावर टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. कोणताही धागा दोरा नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी हा परळ नागपाडा परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. त्याला परळ येथून अटक केली. आरोपी योगेश हा मूळचा श्रीवर्धन तालुक्यातील वाकळघर येथे राहणारा आहे. त्याच्या विरोधात रायगड दिघी सागरी आणि नवघर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्याला २ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Web Summary : Police arrested Yogesh Rane for the brutal murder of Raju Prabhulkar near Khadavli. A dispute over money led to Rane fatally attacking Prabhulkar with a stone. The accused, with prior offenses, is in police custody until May 2nd.
Web Summary : पुलिस ने खडवली के पास राजू प्रभुळकर की क्रूर हत्या के आरोप में योगेश राणे को गिरफ्तार किया। पैसे के विवाद के चलते राणे ने प्रभुळकर पर पत्थर से हमला कर दिया। आरोपी 2 मई तक पुलिस हिरासत में है।