कल्याण : रविवारी सायंकाली साडे सात वाजता एकाच वेळी उंबर्डे कचरा प्रकल्प आणि आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागली. उंबर्डे कचरा प्रकल्पाची आग विझविण्यात अग्नीशमन दलास यश आले. मात्र आधारवाडी डंपिंगला लागलेली आग आज दुसऱ्या दिवशीही विझलेली नाही. ही आग विझविण्याचे काम अजून सुरुच आहे. आगीवर लवकर नियंत्रण आणले जाईल अशी माहिती अग्नीशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांनी दिली आहे.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे कचरा प्रकल्पात सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्याठिकाणच्या सुक्या कचऱ्याला काल सायंकाळी साडे सात वाजता आग लागली. त्याठिकाणी आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. दरम्यान याच वेळेत आधारवाडी कचरा डंपिंगला आग लागली. मात्र अग्नीशमन दलाच्या गाड्या उंबर्डे प्रकल्पातील आग विझविण्याच्या कामात व्यस्त असल्याने आधारवाडी डंपिंगची आग वाढली.
अग्नीशन दलाने उंबर्डे कचरा प्रकल्पातील आग विझविण्याचे काम आटोपून आधारवाडी डंपिंगची आग विझविण्याकरीता धाव घेतली. त्याठिकाणी लागलेली आग नियंत्रणात आणली आहे. मात्र आग पूर्णपणे विझलेली नाही. त्याठिकाणी आग धुमसते आहे. त्यावर पाण्याचा मारा केला जात आहे. त्याठिकाणी कचरा सुका असल्याने आग लवकर विझत नाही.
आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचरा बायो मायनिंग पद्धतीने नष्ट करण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून सुरु आहे. हा सगळा कचरा संपूर्णपणे नष्ट करुन त्याठिकाणी उद्यान फुलविले जाणार आहे. या डंपिंगवरील निम्मा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात कंत्राटदार यशस्वी झाला आहे. उर्वरीत काम येत्या वर्षभरात मार्गी लावले जाणार आहे. मात्र त्याठिकाणी सुका कचरा आहे. त्याच्या खालच्या थरात मिथेन वायू अति उष्ण वातावरणामुळे तयार होऊन आधारवाडी कचरा डंपिंगला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Web Summary : Fire at Kalyan's Aadharwadi dumping ground persists despite efforts. Firefighters are working to extinguish it; cause suspected to be methane gas. Half the waste has been scientifically destroyed, with a garden planned for the site.
Web Summary : कल्याण के आधारवाड़ी डंपिंग ग्राउंड में आग बुझाने के प्रयासों के बावजूद जारी है। दमकल कर्मी आग बुझाने में लगे हैं; मीथेन गैस को कारण माना जा रहा है। आधी कचरा वैज्ञानिक रूप से नष्ट हो चुका है, और साइट पर एक उद्यान बनाने की योजना है।