कारचालकाने तरुणाला नेले फरफटत; कल्याणमधील थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 14:03 IST2022-03-06T13:52:36+5:302022-03-06T14:03:18+5:30

कल्याण : भर चौकात कारचालकाने कार थांबवणाऱ्या एका तरुणाला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास पश्चिमेतील ...

The driver took the young man for a walk; Thriller video goes viral on social media | कारचालकाने तरुणाला नेले फरफटत; कल्याणमधील थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कारचालकाने तरुणाला नेले फरफटत; कल्याणमधील थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कल्याण : भर चौकात कारचालकाने कार थांबवणाऱ्या एका तरुणाला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास पश्चिमेतील आधारवाडी चौकात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मुलीवरून झालेल्या वादात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

आधारवाडी चौकात सिग्नल लागल्याने तेथे एक कार थांबली. त्या वेळी दुचाकीवरून उतरलेल्या तरुणाने त्या कारवर हातापायाने मारायला सुरुवात केली. सिग्नल सुटताच कारचालकाने आपल्या कारसमोर उभ्या असलेल्या तरुणाला कारसह काही अंतरापर्यंत फरफटत नेले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच बेदरकारपणे कार चालविणाऱ्या चालकाला कारसह शिवाजी चौकात अडवून बाजारपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. प्रवीण चौधरी असे कारचालकाचे नाव असून, एका मुलीवरून झालेल्या वादात प्रवीणने त्रिवेश नामक तरुणाला फरफटत नेल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीणविरोधात कारवाई केली. मात्र शहर पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The driver took the young man for a walk; Thriller video goes viral on social media