भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:39 IST2022-04-18T13:39:24+5:302022-04-18T13:39:41+5:30

मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

The beginning of BJP-MNS alliance ?; Massive protest against water crisis in Kalyan | भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा

भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा

कल्याण- कल्याण ग्रामीण भागात नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील व भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक हंडा कळशी हातात निषेधाचे फलक घेऊन  सहभागी झाले होते. 

मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर राज्यभरात मनसे भाजप युतीची चर्चा रंगली होती. पाण्यासाठी निघालेल्या या मोर्चात मनसे व भाजप दोन्ही एकत्र आल्याने मनसे भाजपा युतीची नांदी तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत राजू पाटील यांनी हा मोर्चा पाण्यासाठी आहे, वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न सुटत नाही, त्यामुळे मोर्चा काढला. तसेच भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असं राजू पाटील यांनी सांगितलं. 

Web Title: The beginning of BJP-MNS alliance ?; Massive protest against water crisis in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.