अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड

By मुरलीधर भवार | Updated: December 15, 2022 19:59 IST2022-12-15T19:59:05+5:302022-12-15T19:59:45+5:30

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी अटक करण्यात आली आहे. 

The accused has been arrested for the rape and murder of a minor girl   | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड

कल्याण :  9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अखेर 14 दिवसांच्या तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सूरज उर्फ विरेंद्र मिश्र असे आहे. तो मूळचा मध्यप्रदेश येथील दीवा गावचा राहणारा आहे. अटक आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

1 डिसेबर रोजी कल्याण स्टेशन परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीच्या आवारात एका नऊ वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली होती. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये धक्कादायक माहिती समोर आली. मुलीवर लैगिंक अत्याचारही केला होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कल्याणचे एडिशन सीपी दत्तात्रय शिंदे, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमली होती. काही संशयतीना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर या संशयितांना या गुन्हयात काही संबंध नसल्याचे समोर आले. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला होता. 

या सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलिस आरोपीच्या शोधात होते. महात्मा फुले पोलिसांची गुन्हे प्रकटीकरणाचे पथक एपीएय दीपक सरोदे, हरीदास बोचरे आणि अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी हे आरोपीच्या शोधात हेोते अखेर 14 दिवसांनी आरोपीला पोलिसांनी शोधून काढले. सूरज उर्फ विरेंद्र मिश्र 32 असे या आरोपीचे नाव आहे. सूरज हा मध्यप्रदेश राज्यातील दिवाचा राहणारा आहे. आरोपीचे आई वडिल आणि चार बहिणी असा परिवार आहे. 2013 साली कल्याण पश्चिमेतील भानूसागर चित्रपट गृहाच्या परिसरात एका लहान मुलावर लैगिंक अत्याचार केल्याने त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली होती. 

1 डिसेंबरच्या पहाटे पहिली लोकल पकडून तो बदलापूरहून कल्याणला आला. मुलीचे आई वडील फिरसा असत्याने मुलगी आई वडिलांसोबत झोपलेली असताना तिला उचलून नेले. तिची हत्या केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. सूरज जिवंत आहे की, नाही याची माहिती त्याच्या कुटुंबियांना काही एक माहिती नव्हती. कारण तो गुपचूप शिक्षा भोगत होता. 15 नोव्हेबर रोजी तो शिक्षा भोगून तो बाहेर आला. एका बकरीवर लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला होता. या घटनेवरुन तो किती विकृत आहे हे दिसून येते. या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
 
  

Web Title: The accused has been arrested for the rape and murder of a minor girl