...म्हणूनच दोन्ही पत्नींनी विशालला सोडले, सोशल मीडियाच्या माध्यमातून साक्षीशी झाली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:09 IST2024-12-29T10:08:54+5:302024-12-29T10:09:16+5:30
..यापूर्वीही गवळीच्या दोन पत्नी त्याच्या लैंगिक छळाला कंटाळून त्याला सोडून गेल्या. गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्यासाठी मदत न केल्यास, तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास मारून टाकण्याची धमकी विशालने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

...म्हणूनच दोन्ही पत्नींनी विशालला सोडले, सोशल मीडियाच्या माध्यमातून साक्षीशी झाली ओळख
कल्याण : गुंड विशाल गवळीची तिसरी पत्नी साक्षीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर, दोघांनी लग्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. विशाल साक्षीचा शारीरिक छळ करीत होता. यापूर्वीही गवळीच्या दोन पत्नी त्याच्या लैंगिक छळाला कंटाळून त्याला सोडून गेल्या. गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्यासाठी मदत न केल्यास, तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास मारून टाकण्याची धमकी विशालने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत, तिची हत्या करण्यात आल्याची घटना कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यानंतर, विशालने पत्नी साक्षीच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. साक्षी ही विशालची तिसरी पत्नी असून, एका खासगी बँकेत कामाला असलेल्या साक्षीला २०-२२ हजार रुपये पगार होता.
...‘तिची’ साक्ष महत्त्वाची
- साक्षीसोबत लग्न केल्यानंतर विशालने तिचाही शारीरिक व लैंगिक छळ करायला सुरुवात केली.
- विशालच्या याच छळाला कंटाळून त्याच्या दोन पत्नी त्याला सोडून गेल्या. विशालची पहिली पत्नी ही गुजराथी होती.
- गवळीच्या अनेक कारनाम्यांची साक्षीला माहिती आहे, परंतु विशालला राजकीय दबावापोटी जामीन मिळाला, तर तो आपलीही हत्या करील, अशी भीती साक्षीला वाटते.
- मुलीच्या हत्येच्या प्रकरणात साक्षी पोलिसांकरिता साक्षीदार ठरू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.