शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी राजनोली ते कल्याण दुर्गाडी उन्नत मार्गासह मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदा २ महिन्यात काढली जाणार

By मुरलीधर भवार | Updated: April 23, 2026 18:11 IST

दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा- नेताजी चौक ते कल्याण स्टेशन; शिंदे सेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती

- मुरलीधर भवार

कल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याणमेट्रो मार्गातील राजनोली ते कल्याण दरम्यान उन्नत मार्गासह मेट्रो रेल्वेच्या सुधारीत कामाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या मार्गाच्या कामासाठी येत्या २ महिन्यात निविदा काढली जाणार आहे. हे काम येत्या २ वर्षात मार्गी लागणार असल्याची माहिती शिंदे सेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे.

ठाणे-भिवंडी -कल्याण मेट्रो रेल्वेच्या कामाला २०१६ साली मंजूरी देण्यात आली हाेती. ही मंजूरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या कामाचा शुभारंभ डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र प्रकल्पाच्या मंजूरीपासूनच शिंदे सेनेचे शहर प्रमुख पाटील यांनी ही मेट्रो रेल्वे कल्याण दुर्गाडी चौकातून थेट कल्याण बाजार समितीपर्यंत न नेता ती खडकपाडा मार्गे बाजार समितीकडे नेण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा पाटील यांनी लावून धरला होता. त्यांच्या मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारात घेतली. ही मेट्रो रेल्वे आत्ता कल्याण दुर्गाडी ते आधारवाडी-खडकपाडा- नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, शिवाजी चौक मार्गे कल्याण बाजार समितीपर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर कल्याण बोईर वाडी ते उल्हासनगर असा या मेट्रोचा विस्तार राहणार आहे. राजनोली ते कल्याण दुर्गाडी उन्नत मार्गासह ही मेट्रो रेल्वे धावणार आहे.

ठाणे ते भिवंडीतील धामणकर नाका पर्यंत मेट्राेचे काम मार्गी लागले आहे. धामणकर नाका ते काही परिसरात ही मेट्रो भूमिगत असणार आहे. धामणकर नाका -राजनोली-कल्याण दुर्गाडी- कल्याण खडकपाडा मार्गे कल्याण स्टेशन अशी मेट्रो मार्गाची रचना आहे. त्यात १७ मेट्रो रेल्वे स्थानके आहेत.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेसाठी यापूर्वी ८ हजार ४१६ कोटी रुपये खर्च होणार होता. आत्ता उन्नत मार्गासह मेट्रो प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याने त्यात १ हजार ४२७ कोटी रुपयांचा वाढीव खर्च होणार आहे. हा खर्च धरुन आत्ता एकूण ९ हजार ८४३ कोटी रुपये खर्चास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

मेट्रोचे जाळे कसे ?ठाणे-भिवंडी-कल्याण, कल्याण-तळोजा, तळोजा -नवी मुंबई, नवी मुंबई-शीळफाटा, शीळफाटा-तळोजा, शीळफाटा- मुब्रा मार्गे ठाणे असे मेट्रोचे जाळे भविष्यात तयार होणार आहे. दिवा पनवेल या मार्गावरील रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. तिथे उपनगरीय रेल्वे सेवा नाही. तर भिवंडी रोड आणि खारबाव हे दिवा वसई मार्गावरील रेल्वे स्थानक भिवंडी शहरापासून दूर आहे. भिवंडी हे शहर मेट्रो रेल्वेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे भिवंडीची कनेक्टीव्हीटी प्रबळ होणार आहे. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, तळोजा ही शहरे उद्योगनगरी आहेत. या उद्योगनगरीत काम करणारे कामगारांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi-Kalyan Metro: Tender in 2 Months, Project to Finish in 2 Years

Web Summary : The Bhiwandi-Kalyan Metro project gets state approval. Tender for Rajnoli-Kalyan elevated route to be out in two months, completion expected in two years. Route extended to Kalyan Market via Khadakpada, benefiting industrial workers. Cost increased to ₹9,843 crore.
टॅग्स :kalyanकल्याणMetroमेट्रो