धावत्या एक्सप्रेसवर केली दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 10:05 IST2022-11-29T10:04:50+5:302022-11-29T10:05:40+5:30
महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

धावत्या एक्सप्रेसवर केली दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक केल्याने एका महिला प्रवाशाच्या डोळ्य़ाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानकादरम्यान घडली. कल्याणरेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरु केला आहे.
ठाणे येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. सोमवारी सकाळी नांदेडहून राज्यराणी एक्सप्रेसने कल्याणला येत असताना आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान अज्ञाताने गाडीवर दगड फेकला. या दगडफेकीत महिला प्रवासी रखमाबाई पाटील (५५) यांच्या डोळ्य़ाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना नव्हती. मात्र, प्रसारमाध्यमातून बातम्या प्रसारित झाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिस खडबडून जागे झाले. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ज्या ठिकाणी महिलेवर दगडफेक झाली आहे, त्या ठिकाणाहून अनेक वेळा दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.