शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

श्रीकांत शिंदे यांना थेट लढतीत लागणार लॉटरी

By मुरलीधर भवार | Published: April 13, 2024 8:06 AM

कल्याण लाेकसभा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी आहे. त्याला अजून बराच वेळ असल्याने शिंदे आणि दरेकर यांनी प्रचारफेऱ्या, सभा असा जाहीर प्रचार अजून सुरू केलेला नाही.

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याणलोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचार सुरू केला असला व खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी शिंदेसेनेने त्यांची उमेदवारी अधिकृत जाहीर केलेली नाही. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषित झाली. भाजपची साथ शिंदे यांना कशी मिळते, याकडे लक्ष आहे तर उद्धवसेनेतील एका गटाची नाराजी दरेकर यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे.

कल्याण लाेकसभा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी आहे. त्याला अजून बराच वेळ असल्याने शिंदे आणि दरेकर यांनी प्रचारफेऱ्या, सभा असा जाहीर प्रचार अजून सुरू केलेला नाही. दोन्ही उमेदवार सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क करत आहेत. श्रीकांत यांनी २०१४ च्या निवडणुकीत चार लाख ४० हजार मते मिळवली तर २०१९ च्या निवडणुकीत पाच लाख ५९ हजार मते मिळवली. त्यांच्याविरोधात अनुक्रमे आनंद परांजपे व बाबाजी पाटील हे उमेदवार होते. त्यांना अनुक्रमे एक लाख ९० हजार व दोन लाख १५ हजार मते मिळाली होती.   

 कल्याण पूर्वेतील भाजपमधील नाराजी आटोक्यात आणण्त्साठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बरेच प्रयत्न केले असून, त्याला यश आले आहे.  खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिला गेला आहे. डोंबिवली व अन्य भागांतून शिंदेसेनेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 दरेकर यांनी २००९ मध्ये मनसेतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी आनंद परांजपे यांच्याशी त्यांची लढत होती.  दरेकर यांना एक लाख दोन हजार मते मिळाली होती व त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.  शरद पवार गटाची लाखभर मते आपल्याकडे वळवण्यात दरेकर यांना कितपत यश येते, त्यावर त्यांचे मतांचे गणित अवलंबून आहे. मात्र पवार गट किती सहकार्य करेल हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याणlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक