म्हणून मनसे आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करून केले चक्क गुजराती भाषेत ट्विट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 21:20 IST2021-01-11T21:19:21+5:302021-01-11T21:20:19+5:30
Uddhav Thackeray News : भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे.

म्हणून मनसे आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करून केले चक्क गुजराती भाषेत ट्विट...
डोंबिवली - मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी डिसेंबर महिन्यात केली होती,त्याचे पत्र सुद्धा दिले होते मात्र यावर लक्ष न दिल्याने चक्क मनसे आमदार राजू पाटील यांनी चक्क गुजराती भाषेत ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे. मुंबई
महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा शिवसेनेने दिला आहे.मात्र यावर भाजपने टीका केलीच तर मनसेही पाठी नाही राहिले आहे.मनसे आमदार यांनी गुजराती मध्ये ट्विट करत चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढत मराठी माणसांची आठवण करून दिली आहे.महाराष्ट्रात मराठी नंबरप्लेट वर कारवाई केली जात आहे,जरा लक्ष द्या. मराठी माणूस आपल्याकडे आशेने बघत आहे.हेच ट्विट मनसे आमदार राजू पाटील गुजराती भाषेत करत उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.आतातरी मुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का हे पाहावे लागेल.