पालिका निवडणुकीपूर्वीच कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा धमाका, भाजपा, मनसेला दिला जोरदार धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 21:54 IST2021-11-22T21:53:29+5:302021-11-22T21:54:28+5:30
KDMC News: केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसेला जोरदार दे धक्का दिला आहे. भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत आपल्या हाती शिवबंधन बांधले.

पालिका निवडणुकीपूर्वीच कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा धमाका, भाजपा, मनसेला दिला जोरदार धक्का
कल्याण - केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसेला जोरदार दे धक्का दिला आहे. भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत आपल्या हाती शिवबंधन बांधले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला.
भाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. प्रकृती चांगली नसल्याने डॉ. सुनिता पाटील या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत या सर्वांनी आपल्या हाती शिवबंधन बांधलेले पाहायला मिळाले.
आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजप आणि मनसे या आपल्या प्रतिस्पर्ध्यावर धक्कातंत्राद्वारे एक पाऊल पुढे टाकले आहे.