डोंबिवलीत शिवसेना-भाजपा 'मनोमिलन'! रवींद्र चव्हाण अन् खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 00:57 IST2025-12-15T00:22:33+5:302025-12-15T00:57:01+5:30
Ravindra Chavan Shrikant Shinde Dombivli, Shiv Sena BJP together: भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरु असलेला वाद मिटल्याची चिन्हे दिसत आहेत

डोंबिवलीत शिवसेना-भाजपा 'मनोमिलन'! रवींद्र चव्हाण अन् खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र
Ravindra Chavan Shrikant Shinde Dombivli, Shiv Sena BJP together: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सारंकाही आलबेल नसल्याचे चित्र होते. कल्याण-डोंबिवली परिसरात भाजपा विरूद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना सुरु असल्याचेही अनेक राजकीय तज्ज्ञांनी सांगितले होते. पण दोन दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर आज पहिल्यांदाच चव्हाण-शिंदे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे राजकारण सुरु होते. मात्र डोंबिवलीच्या क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनला शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यानंतर दोन्ही पक्षात फोडाफोडीचे राजकारण शांत झाले असल्याचा दावा केला जात आहे. आज केडीएमसीकडून जुनी डोंबिवली येथे २.५ लक्ष मिली जलकुंभ आणि पंपिंग हाऊसचे भूमिपूजन झाले. त्याप्रसंगी दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.