डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्सचा धंदा, पार्लर मॅनेजरला अटक 

By मुरलीधर भवार | Updated: December 9, 2023 20:27 IST2023-12-09T20:26:57+5:302023-12-09T20:27:57+5:30

डोंबिवली पेंढरकर का’लेज परिसरात आर्कीनिया नावाची इमारत आहे. या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे मसाज पार्लर सुरु होते.

Sex business under the name of massage parlor in Dombivli parlor manager arrested | डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्सचा धंदा, पार्लर मॅनेजरला अटक 

डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्सचा धंदा, पार्लर मॅनेजरला अटक 

डोंबिवली-डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा भांडा फोड करुन पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली आहे. या मसाज पार्लरचा मॅनेजर नितीन भुवड याला अटक करण्यात आली आहे. मसाज पार्लर चालविणारा मालक मुकुंद वाघमारे याचा पोलिस शोध घेत आहे. डोंबिवली पेंढरकर का’लेज परिसरात आर्कीनिया नावाची इमारत आहे. या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे मसाज पार्लर सुरु होते.

डोंबिवली पूर्वेतील पेंढरकर का’लेज परिसरात मानपाडा पोलिसांना माहिती मिळाली की, अनेक दिवसापासून आर्कीनिया इमारत मसाज पार्लरच्या नावाखाली काही तरुणींकडून देह व्यापार सुरु आहे. या परिसरात मोठे कॉलेज आणि मोठी हॉटेल आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांना माहिती मिळताच पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्या दरम्यान पोलिसांना काही तरुणी आढळून आल्या. मिळालेल्या माहिती नुसार पाेलिस अधिक चौकशी केली असता तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली. याठिकाणी केवळ नावाला मसाज पार्लर सुरु होता. पार्लरच्या नावाखाली तरुणींकडून देहविक्री करुन घेतली जात होती. या प्रकरणी मसाज पार्लरचा मॅनेजर नितीन भुवड याला अटक केली आहे. मसाजचा मालक मुकुंद वाघमारे हा पसार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. डोंबिवलीसारख्या शहरात अशा प्रकारची बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुऱ्हाडे यांनी सांगितले की, मानपाडा पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
 

Web Title: Sex business under the name of massage parlor in Dombivli parlor manager arrested