शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

"२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची, एमआयडीसी, महापालिकेत समनव्याचा अभाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 17:08 IST

Ravindra Chavan And 27 Villages Water : मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा

डोंबिवली - २७ गावांत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. तातडीने त्यावर उपाय योजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यामध्ये लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी देसाईंकडे केली. सोमवारी चव्हाण यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली, त्यावेळी २७ गावातील पाणी समस्येवर चर्चा झाली. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणी वितरण सुरळीत होईल असे अधिकारी कसे काय सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी उद्योगमंत्री देसाई यांना केला. त्यांनी मोबाइलवरून या समस्ये संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. 

मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या पण समस्या तात्काळ सोडवा असे चव्हाण म्हणाले. एखादी महिला नगरसेवक आत्मदहन इशारा देते यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून पाणी समस्या तात्काळ मार्गी लावा असे ते।म्हणाले. त्यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदींसह कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.

१०० टँकरने सर्वत्र गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात यावा असे चव्हाण म्हणाले. पाणी सगळ्यांना मिळायला हवं याचे नियोजन करा. त्या टँकरचे मूल्य कोणाकडून घेऊ नका. त्यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करू शकतील. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथं का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीWaterपाणीSubhash Desaiसुभाष देसाई