Rain Update: बारवी धरणामध्ये ६१.६१ टक्के पाणीसाठा, विसर्गाबाबतचा तो मेसेज चुकीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 15:27 IST2021-07-22T15:26:07+5:302021-07-22T15:27:42+5:30
Thane Rain Update: सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण सह इतर परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे.

Rain Update: बारवी धरणामध्ये ६१.६१ टक्के पाणीसाठा, विसर्गाबाबतचा तो मेसेज चुकीचा
कल्याण- सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण सह इतर परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. बारवी धरणात आतापर्यंत 61.61 टक्के पाणीसाठा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे परवापर्यंत बारवी धरणात 50 टक्के साठा झाला होता. आणि काल झालेल्या मुसळधार पावसाने एका दिवसात पाणीसाठ्यात 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी बारवी धरणात 46 टक्के पाणीसाठा होता.
"तो मेसेज चुकीचा "
बारवी धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरणे बाकी आहे. मात्र 'बारवी धरणाचे पाणी सोडल्याने कल्याण परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचा' चुकीचा मेसेज सध्या फिरत आहे. बारवी धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरणे बाकी असल्याने त्याचे पाणी सोडण्याचा कोणताच विषय येत नसून नागरिकांनी शहानिशा न करता कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.