शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

खासगी रुग्णालयाला १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 11:44 PM

केडीएमसीची कारवाई : जैविक कचरा टाकला उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मनाई असतानाही जैविक वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या पश्चिमेतील श्री सद्गुरू कृपा या खासगी रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली आहे. पश्चिमेतील घन:श्याम गुप्ते रोडवरील बदाम गल्लीत मोकळ्या जागेत जैविक कचरा (मेडिकल वेस्ट) टाकण्यात आला होता. याप्रकरणी या रुग्णालयाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जैविक वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास त्यापासून नागरिकांना अपाय होऊ शकतो, याकरिता हा कचरा रुग्णालय आणि क्लिनिक यांच्याकडून संकलित करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने उंबर्डे येथील बायोमेडिकल प्रकल्पावर विघटन करण्यासाठी आरोग्य विभागाने एजन्सीची नियुक्ती केलेली आहे. या एजन्सीकडे आपल्या दवाखान्यातील, क्लिनिकमधील जैविक कचरा देणे अपेक्षित असतानाही पश्चिमेतील श्री सद्गुरू कृपा या रुग्णालयामधून मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात जैविक कचरा टाकला जात असल्याची तक्रार ट्विटरद्वारे प्राप्त होताच मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या सुचनेनुसार ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, प्रभारी आरोग्य निरीक्षक नवनाथ लांडगे यांनी संबंधित ठिकाणी समक्ष पाहणी केली. यात रुग्णालयाने सार्वजनिक ठिकाणी जैविक कचरा टाकत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येताच रुग्णालयास दंड भरण्यास सांगितले. परंतु, प्रारंभी रुग्णालयाने दंड भरण्यास नकार दिला. यावर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगताच संबंधित रुग्णालयाने १० हजार रुपयांचा दंड महापालिकेकडे जमा केल्याची माहिती प्रभाग अधिकारी गुप्ते यांनी दिली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण