बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 06:49 IST2025-08-12T06:48:10+5:302025-08-12T06:49:08+5:30
छातीत दुखू लागल्याने घरी गेले आणि काही वेळानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आले.

बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले
बदलापूर : सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय रोकडे (५७) यांचा कर्तव्य बजावत असताना रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात कर्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व मुलगी, जावई व नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बदलापूर पश्चिमेकडील मोहनानंदनगर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोकडे हे ड्यूटीवर आले असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते घरी गेले. काही वेळानंतर ते पुन्हा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आले. पुन्हा छातीत दुखू लागल्याने सहकाऱ्यांनी रोकडे यांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र ते रुग्णालयात न जाता थेट घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.