गहाळ झालेले ४० मोबाईल पोलिसांनी केले परत 

By सचिन सागरे | Updated: June 25, 2023 18:05 IST2023-06-25T18:05:23+5:302023-06-25T18:05:43+5:30

विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले ४० मोबाईल कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने शोधून काढत मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे.

Police recovered 40 missing mobile phones | गहाळ झालेले ४० मोबाईल पोलिसांनी केले परत 

गहाळ झालेले ४० मोबाईल पोलिसांनी केले परत 

कल्याण : विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले ४० मोबाईल कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने शोधून काढत मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे. कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. 

चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे पोलिसांच्या समोर एक मोठे आवाहन असते. कल्याण गुन्हे शाखा घटक तीनच्या पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे ४० मोबाईल शोधून काढले आहे. ते मोबाईल फोन धारकांना बोलावून त्यांना मोबाईल परत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, संजय माळी, पोलीस हवालदार विलास कडू, बालाजी शिंदे व बापूराव जाधव यांनी केली आहे.

Web Title: Police recovered 40 missing mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.